Who Is Recognized As Most Handsome Man In The World? बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक सुपरस्टार आहेत, जे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. या स्टार्सवर देशात आणि जगात खूप प्रेम केलं जातं. त्याचबरोबर काही जण असे आहेत, जे अभिनयासोबतच त्यांच्या लूकसाठीही चर्चेत असतात. अनेकदा प्रश्न चर्चेत असतो की, बॉलिवूडचा सर्वात देखणा स्टार कोण? त्यावर सोशल मीडियावर चाहते आपली वेगवेगळी मतं देत असतात. कोणी हृतिक रोशन म्हणतं, तर कुणी शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणतं... तर अजूनही काहीजण धर्मेंद्र (Dharmendra) यांनात बॉलिवूडचा सर्वात देखणा स्टार मानतात. पण, तुम्हाला माहितीय का? प्रत्यक्षात हा खिताब कुणाकडे आहे?
दोन स्टार्सना मिळालेला दर्जा
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रेडिट पोस्टनुसार, बॉलिवूडमध्ये आतापर्यंत फक्त दोन स्टार्सना 'जगातील सर्वात देखणा माणूस' म्हणून ओळखलं जातं. हिस्ट्री टीव्हीनं या पोस्टमध्ये एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यानुसार, 70 च्या दशकाच्या मध्यात, ही-मॅन धर्मेंद्र यांना जगातील सर्वात देखणा माणूस म्हणून निवडण्यात आलेलं आणि त्यानंतर बॉलिवूडचा दबंग म्हणजेच, सलमान खानला हा किताब देण्यात आलेला. 2004 मध्ये, सलमानला जगातील सर्वात देखणा माणूस म्हणून निवडलं गेलं.
सलमान खान, 'Most Handsome Man In The World'
Most Handsome Man In The World हा कोणताही अधिकृत किताब नाही, सलमान खानला वेगवेगळ्या सर्वे आणि मतांच्या आधारावर ही उपाधी देण्यात आली आहे. 2004 मध्ये पीपुल मॅग्झीननं जगभरात सातव्या सर्वात हँडसम व्यक्तीचा दर्जा देण्यात आला होता. याव्यतिरिक्त त्यांच्या लंडन (2008) आणि न्यूयॉर्क (2012) मध्ये मॅडम तुसादच्या म्युझियममध्ये वॅक्स स्टॅच्यू बनवण्यात आले. आजही वयाच्या 59व्या वर्षी सलमान खान सर्वाधिक लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :