Who is Babydoll Archi: सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो जोरदार व्हायरल होत असून एकाच नावाची चर्चा रंगली आहे. ते नाव म्हणजे, 'बेबी डॉल आर्ची', आसामची प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन. जिला सोशल मीडियावर 'बेबी डॉल आर्ची' (Babydoll Archi) म्हणून ओळखलं जातं. तिचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत अमेरिकन अडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील (American adult Film Industry) प्रसिद्ध केंड्रा लस्ट (Kendra Lust) दिसतेय, जी सध्या सोशल मीडियावर त्सुनामी घेऊन आली आहे. 

'बेबी डॉल आर्ची'चा केंड्रा लस्टसोबतचा फोटो व्हायरल 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर्चीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये 'बेबी डॉल आर्ची' आणि केंड्रा लस्ट एकत्र दिसतायत. 'बेबी डॉल आर्ची' आणि केंड्रा लस्टचा फोटो समोर येताच तो वेगानं व्हायरल झाला आणि ही असामान्य जोडी लोकांच्या नजरेत आली. फोटोच्या कॅप्शनमध्ये आर्चीनं केंड्रा लस्टचा आत्मविश्वास, कौशल्य आणि यशाचं कौतुक केलं आहे. तसेच, तिनं हा क्षण कायम आठवणीत राहणारा आहे, असंही म्हटलं आहे.

'बेबी डॉल आर्ची'नं एडल्ट इंडस्ट्री जॉईन केली? 

'बेबी डॉल आर्ची' आणि केंड्रा लस्टचा फोटो व्हायरल झाल्यानंतर असे अंदाज बांधले जात आहेत की, आर्चीनं अमेरिकी अडल्ट इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. दरम्यान, आर्चीनं मात्र यावर अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही. तिनं एका पोस्टमध्ये लिहिलंय की, "काही वाटा अत्यंत खाजगी असतात. तर, काही पावलं राजकीय असतात... शांत राहण्यात अशी शक्ती असते, जी शब्दांमध्ये नसते... " तिच्या या उत्तरानं लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.  

अर्चिता फुकन, 'बेबी डॉल आर्ची' कोण? 

केट लिनच्या 'डेम उन गर' या गाण्यावरील इंस्टाग्राम रील इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे आसामी मॉडेल अर्चिता फुकन चर्चेत आली. तिच्या रीलनं खूप लक्ष वेधलं आणि इतर अनेक प्रभावशाली लोकांनाही प्रेरणा दिली. पण तुम्हाला माहिती आहे का? की तिला रातोरात कोणी व्हायरल केलं? हे अजूनही एक गूढ आहे. दरम्यान, सर्च इंजिनवर 'अर्चिता फुकन व्हिडिओ व्हायरल ओरिजिनल' आणि 'अर्चिता फुकन व्हिडीओ व्हायरल लिंक' सारख्या प्रश्नांचा पूर येतो. लोक अर्चिता फुकनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तिच्याबद्दल गुगलवर सतत शेअर करत असतात. 

'बेबी डॉल आर्ची' तिच्या बोल्ड फॅशन स्टाईलसाठी आणि ट्रान्झिशन व्हिडीओंनी प्रेक्षकांना वेड लावतं. तिचा अनोखा अंदाज तिची सोशल मीडियावरची ओळख आहे.

Viral व्हिडीओनंतर वाद-विवाद 

केंड्रा लस्टसोबत आर्चीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावरच गदारोळ झाला की, हा फोटो खरा आहे का? काहींचं असंही म्हणणं आहे की, हा फोटो AI-जेनरेटेड  असू शकतो. या फोटोमुळे आर्चीच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे.

'बेबी डॉल आर्ची'नं तिच्या दमदार कंटेंट आणि स्पष्टवक्तेपणाच्या शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर खळबळ उडवून देणाऱ्या पूर्वीच्या लीक झालेल्या खाजगी व्हिडीओ क्लिपच्या वादानंतरही, ती अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आणि तिचे चाहते प्रचंड आहेत. केंड्रा लस्टसोबतच्या तिच्या फोटोबद्दल नेटिझन्स अजूनही बोलत आहेत. तिनं संपूर्ण भारतात आपली छाप पाडली आहे आणि तिची ऑनलाईन पर्सनॅलिटीही मजबूत आहे.

केंड्रा लस्ट कोण आहे? 

केंड्रा लस्ट ही अमेरिकन प्रौढ चित्रपट उद्योगातील एक अतिशय प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार आहे. तिनं अनेक वर्षांपासून या उद्योगात काम केलं आहे आणि जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. ती तिच्या कौशल्य आणि फिटनेससाठी देखील ओळखली जाते. तिचं खरं नाव केएल बेकर आहे आणि ती अनेकदा नवीन कलाकार आणि प्रभावशाली कलाकारांसोबत काम करते. तिच्या उपस्थितीमुळे बेबी डॉल आर्चीच्या फोटोची आणखीनच चर्चा झाली आहे.