Abhijeet Sawant in Bigg Boss Marathi season 5 :  इंडियन आयडलचा पहिला सिझन जिंकणारा मराठमोळा गायक अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. बिग बॉस मराठीकडून (Bigg Boss Marathi Season 5) शेअर करण्यात आलेल्या एका प्रोमोनंतर अभिजीतच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली होती. पण आता त्याच्या एन्ट्रीने या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहे. 

Continues below advertisement


अनेक गाजलेल्या मराठी गाण्यांना अभिजीतने आवाज दिला आहे. त्यामुळे त्याच्या गाण्यांचे आणि सुरांचे लाखो चाहते आहेत. आता अभिजीतला बिग बॉसच्या खेळाचा सूर गवसणार का याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे अभिजीत बिग बॉसच्या घरात कशी खेळी खेळणार ही उत्सुकता देखील अनेकांना लागून राहिलीये. 


'हे' कलाकार बिग बॉसच्या घरात


बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, पंढीरानाथ कांबळे उर्फ पॅडी, अभिजीत सावंत यांनी एन्ट्री घेतली आहे. दरम्यान एन्ट्रीच्या वेळी स्पर्धकांना दोन पर्याय देण्यात आले. बिग बॉसची करन्सी किंवा एक पावर कार्ड असा ऑप्शन देण्यात आलाय. त्यामध्ये अनेकांनी पॉवर कार्डची निवड केली तर काहींनी करन्सी घेतली. त्यामुळे आता खेळात चांगलीच रंगत येणार असल्याचं पाहायला मिळतंय.                                                                                     


रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार


काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे. 






ही बातमी वाचा : 


Paddy Kamble : मराठी मनोरंजनाचा राजा पॅडी बिग बॉस मराठीच्या घरात, हास्याचा फुलटॉस टाकणार की चक्रव्युहात अडकणार?