Yashs Voice Dubbed in Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अभिनित ' रामायण ' (Ramayan) हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने दमदार ओपनिंग केली आहे. या सिनेमात दिग्गच कलाकारांची फौज पहायला मिळत आहे. या सिनेमाची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे. रावण यांची भूमिका साऊथ सुपरस्टार यश (Yash) याने साकारली. यशचा डायलॉग आणि आवाजावर प्रेक्षक फिदा झाले आहेत. हिंदी ' रामायण ' मध्ये प्रेक्षक रावण यांच्या डायलॉगचे कौतुक करत आहे. हिंदी ' रामायण ' मध्ये यशच्या आवाजाला डब करण्यात आलं आहे. पण यशच्या पात्राला कोणी आवाज दिला? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

अभिनेता शरद केळकरने दिला आवाज (Who Dubbed for Yash in Ramayana)

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी वर्जनमध्ये शरद केळकरने यशच्या पात्राला आवाज दिला आहे. यश स्वतः उत्तम हिंदी बोलतो. व्हरायटी ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, शरद केळकरने सांगितलं की, ' यशने या सिनेमात उत्तम काम केलं आहे. त्याने केलेल्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मला या सिनेमासाठी डब करताना चांगलं वाटलं. यश उत्तम हिंदी बोलतो. पण त्याने अधिक कन्नड सिनेमात काम केलं आहे '.

' त्याच्या बोलण्यात एक विशेष लकब आहे. यामुळे त्याच्या हिंदी शब्दांच्या लयीत अडचणी येत होत्या. त्यामुळे संपूर्ण टीमला असे वाटले की, हिंदी वर्जनमध्ये डब करणे गरजेचं वाटले. यशने कन्नडमध्ये उत्तम काम केलं आहे. त्याच्या स्वतःचा आवाज खूप प्रभावी आहे '. असं शरद केळकर म्हणाला. डबिंगच्यावेळी यश आणि शरद खेळकर या दोघांनी मिळून एकत्र काम केलं होतं.

Continues below advertisement

शरदने सांगितलं की, ' यश खूप मनमिळाऊ आहे. त्याने डबिंग वेळी अनेक सूचना दिल्या. हिंदी प्रेक्षकांना उत्तम अनुभव मिळावा. यासाठी संपूर्ण टीमने एकच ध्येयाने एकत्र काम केले आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित  'रामायण: राइज ऑफ द लेजेंड'  या सिनेमात, रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, रवी दुबे, सनी देओलने महत्वाची भूमिका साकारली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Salman Khans Maatrubhumi: सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?