Raj Kapoor : राज कपूर आणि नर्गिस यांची प्रेमकहाणी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. राज कपूर यांनी नर्गिसला पाहताच तिच्यामध्ये हरवून गेले होते. नर्गिस तितकीच सुंदर होती. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले आणि या जोडीने चित्रपटाच्या पडद्यावर राज्य करण्यास सुरुवात केली. दोघांची प्रेमकहाणीही पुढे जात होती. नर्गिसला राज कपूरची पत्नी व्हायचं होतं, पण विवाहित राज कपूर यांना पत्नीला घटस्फोट घ्यायचा नव्हता. या प्रकरणाबाबत नर्गिसने एकदा तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी संपर्क साधला होता, जेणेकरून लग्नासाठी कायदेशीर मार्ग काढता येईल.

Continues below advertisement


बरसात चित्रपटादरम्यान नर्गिस आणि राज कपूर यांच्यात जवळीक 


बरसात चित्रपटादरम्यान नर्गिस आणि राज कपूर यांच्यात खूप जवळीक निर्माण झाली होती. नर्गिसने तिचे पैसे राज कपूरच्या आरके स्टुडिओमध्ये गुंतवायला सुरुवात केली. नर्गिसची मैत्रिण नीलमने सांगितले होते की, राज कपूर अनेकदा नर्गिसला सांगायचे की तो नक्कीच तिच्याशी लग्न करेल. पण कालांतराने नर्गिसला वाटू लागले की राज कपूर आपल्या पत्नीला कधीही घटस्फोट देणार नाही. राज कपूर यांच्याशी घटस्फोट न घेता त्यांच्याशी लग्न करण्याचा मार्ग शोधण्यासाठी नर्गिस यांनी तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी संपर्क साधला होता. मधु जैन त्यांच्या 'फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा: द कपूर्स' या पुस्तकात लिहितात, 'नर्गिसची लग्नाची इच्छा इतकी प्रबळ झाली की तिने ते कायदेशीररित्या कसे करता येईल याबद्दल बॉम्बेचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांचा सल्लाही मागितला. जेणेकरून कायदेशीर राज कपूरशी लग्न करू शकेल.


आणि नर्गिस यांनी काढता पाय घेतला!


राज कपूर यांनाही नर्गिससोबत लग्न करायचे होते पण वडील पृथ्वीराज कपूर यांचा याला कडाडून विरोध होता. हळूहळू नर्गिसलाही समजले की राज कपूर तिच्याशी कधीच लग्न करणार नाही आणि तिने राज कपूरच्या आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. नर्गिसने राज कपूर यांना न सांगता आरके फिल्म्सच्या बाहेर मदर इंडिया हा चित्रपट साइन केला तेव्हा राज कपूर यांना हे कळले. असेही म्हटले जाते की, एके दिवशी नर्गिसने राज कपूरला त्यांच्या पत्नीला हार घालताना पाहिले, त्यानंतर तिने त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. खरे तर नर्गिसने त्या दिवशी राज कपूरसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता. बराच वेळ थांबूनही जेव्हा राज कपूर आले नाहीत तेव्हा ती त्यांच्या घरी पोहोचली. राज कपूर यांच्या पत्नीच्या वाढदिवसाची त्यांच्या घरी पार्टी सुरू होती आणि त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये पाहिले तर राज कपूर त्यांच्या पत्नीला हार घालायला लावत होते. ते पाहून नर्गिस मागे वळली. मदर इंडियाच्या काळातच नर्गिस सुनील दत्तच्या प्रेमात पडली आणि दोघांनी 1958 मध्ये लग्न केले.


इतर महत्वाच्या बातम्या