Abhishek Bachchan Breaks Silence On Divorce: बॉलिवूडचं मोस्ट फेवरेट कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या (Abhishek Aishwarya Divorce Rumors) चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दोघे बऱ्याच काळापासून एकत्र दिसत नव्हते, ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या एकत्र दिसायच्या, तर अभिषेक आई-वडिलांसोबत दिसायचा. त्यामुळे चर्चांना जोरदार उधाण आलेलं. पण, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगण्याची ही पहिली वेळ नव्हती, यापूर्वीही दोघांच्या घटस्फोटाबाबत चर्चा रंगलेल्या आणि त्यावेळी अभिषेकनं सडेतोड उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केली होती. 

Continues below advertisement

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लव्हस्टोरी नेहमीच बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असते. 2000 च्या दशकात मुझफ्फर अली यांच्या 'उमराव जान' (2006) मध्ये एकत्र काम केल्यापासून दोघांमधील नातं फुललं. त्याच काळात आलेल्या 'धूम 2' मध्ये एकत्र काम करताना त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. मैत्रीपासून सुरू झालेलं नातं प्रेमात कधी रूपांतरित झालं दोघांनाही कळलं नाही आणि त्यानंतर 2007 मध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. 

तेव्हापासून अभिषेक आणि ऐश इंडस्ट्रीतील फेवरेट कपल्सपैकी एक झालं. कालांतरानं मात्र, एकमेकांच्या हातात हात धरुन दिसणारं हे जोडपं काहीसं दुरावल्याचं जाणवलं आणि चर्चा सुरू झाल्या दोघांच्या घटस्फोटाच्या. दोघांच्याही वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याच्या अनेक अफवा पसरल्या. काहींनी दावा केला की, जोडपं घटस्फोटाच्या दिशेनं वाटचाल करतंय. पण, अभिषेक-ऐश्वर्या मात्र यावर काहीच बोलायला तयार नव्हते. 

Continues below advertisement

अखेर अभिषेक बच्चननं दिलं स्पष्टीकरण 

2016 मध्ये अभिषेक बच्चननं निर्णय घेतला की, त्यानं खूप ऐकलं. ऐश्वर्यापासून वेगळं होण्याच्या चर्चा सातत्यानं सुरू होत्या. त्यानंतर अभिनेत्यानं ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं. आपल्या खास कॉमिक टायमिंगसोब अभिषेकनं सर्व अफवा फेटाळून लावल्या. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं की, "ठीक आहे... तर मला वाटतंय की, मी घटस्फोट घेतोय. मला सांगितल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही मला सांगाल का की, मी दुसरं लग्न कधी करतोय? धन्यवाद। #मपेट्स।"

अभिषेकचा कॉमिक अंदाज 

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेकनं कॉमिक अंदाजात उत्तर दिलं, पण बोचणारे शब्द वापरलेले. घटस्फोटाच्या चर्चांवर सेंस ऑफ ह्यूमरचा वापर करुन उत्तर दिल्याबद्दल चाहत्यांनी अभिषेकचं कौतुक केलं. 

या गोष्टींचा कुटुंबावर प्रभाव पडतो 

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नुकतंच अभिषेकनं पुन्हा एकदा उठलेल्या ऐश्वर्या आणि त्याच्या घटस्फोटांच्या अफवांवर सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला की, यापूर्वीही भूतकाळात मी आमच्याबाबत खोट्या कहाण्या ऐकल्यात. पण, आता त्याचं कुटुंब आहे, त्यामुळे यासर्व गोष्टींचा कुटुंबावर वेगळा प्रभाव पडतो. अभिषेक म्हणाला की, "हे खूपच हैराण करणारं आहे. तुम्ही म्हणजे मी नाही, तुम्ही माझं आयुष्य जगत नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Abhishek Bachchan On Divorce Rumours: ऐश्वर्यासोबत लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला अभिषेक बच्चन; म्हणाला...