Panchayat Actor Jitendra Kumar : 'कोटा फॅक्टरी' या वेब सीरिजमध्ये जीतू भैयाची भूमिका करून सर्वांची मने जिंकणारा अभिनेता जितेंद्र कुमार नुकताच 'पंचायत3'मध्ये दिसला. जितेंद्र कुमारने 'अभिषेक त्रिपाठी'ची भूमिका साकारली. आपल्या दमदार अभिनयासोबतच जितेंद्र कुमारने आपल्या सामान्य बोली आणि भाषेने लाखो लोकांची मने जिंकली. जितेंद्र कुमारने आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. अभिनेता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मध्यमवर्गीय मुलांसाठी तो एक प्रेरणास्थान आहे.
आयआयटी खरगपूरमधून सिव्हील इंजिनिअरिंग
जीतू भैय्याचा जन्म 1 सप्टेंबर 1990 रोजी राजस्थानमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शालेय शिक्षण अलवर येथून केले, त्यानंतर आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळाला, जिथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. जितेंद्रप्रमाणेच त्याचे वडीलही सिव्हिल इंजिनिअर होते आणि आई गृहिणी होती. जितेंद्रला दोन बहिणी आहेत, ज्यांची नावे रितू कुमार आणि चित्रा कुमार आहेत. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'पंचायत' या बहुचर्चित मालिकेच्या नवीन सीझनसह प्राइम व्हिडिओ परत आला आहे. IIT खरगपूरचे माजी विद्यार्थी असलेला जितेंद्र TVF च्या YouTube व्हिडिओंद्वारे प्रसिद्धीस आला. 'पिचर्स' आणि 'कोटा फॅक्टरी' सारख्या वेब सिरीज तसेच 'शुभ मंगल सावधान', 'चमन बहार', 'या शोमध्ये काम केले. जादूगर' आणि 'ड्राय डे' सारख्या चित्रपटातही तो दिसला.
जितेंद्र कुमार किती कोटींचा मालक?
जितेंद्र कुमार हा एक उत्तम अभिनेता आहे, जो अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखला जातो. तो मुंबईत एका भव्य घरात राहतो. त्याच्या घराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकल्यास त्याची झलक दिसून येते. 'पंचायत' अभिनेत्याच्या कार कलेक्शनमध्ये 88.18 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ GLS 350d, 82.10 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ ई-क्लास, 48.43 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि 42 लाख रुपयांची आलिशान मिनी कंट्रीमॅन यांचा समावेश आहे.
'बिझनेस स्टँडर्ड', 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या ऑनलाइन रिपोर्टनुसार जितेंद्र कुमारने 'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनमधून 5.6 लाख रुपये कमावले आहेत. तो प्रति एपिसोड 70,000 रुपये घेत असे, त्यानंतर नीना गुप्ता यांनी प्रति एपिसोड 50,000 रुपये आणि रघुबीर यादव यांना 40,000 रुपये मिळाले. अभिनयाव्यतिरिक्त, जितेंद्र कुमार ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियावरील पोस्टमधून चांगली कमाई करतो. तो सध्या ओसवाल बुक्स, बिंगो आणि इन्शुरन्स देखो यांसारख्या अनेक ब्रँडशी संबंधित आहे. अनेक ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार, 'पंचायत' सचिव जी अर्थात जितेंद्र कुमार यांची अंदाजे एकूण संपत्ती 7 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, "पंचायत" च्या पहिल्या दोन सीझनसाठी अभिनेत्याला प्रति एपिसोड 50,000 रुपये मानधन मिळाले होते. टाईम्स नाऊ नवभारतच्या वृत्तानुसार, सीझन 3 मध्ये ग्रामपंचायत सचिव अभिषेक त्रिपाठीची मुख्य भूमिका साकारण्यासाठी जितेंद्रने प्रति एपिसोड 70,000 रुपये घेतले आहेत आणि तो शोमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या