Samantha Raj Marriage Bhut Shuddhi Vivah Method: साऊथ सुपरस्टार (South Superstar) अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी नुकतीच लग्नगाठ बांधलीय. दोघांचंही दुसरं लग्न असून कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात एका खासगी सोहळ्यात दोघांनी सात जन्म एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. समंथा आणि राज यांचा विवाह सोहळा पार पाडला खरा, पण एका आगळ्या-वेगळ्या प्रथेनुसार. समंथा आणि राज यांनी 'भूत शुद्धी विवाह' पद्धतीनं (Bhut Shuddhi Vivah Method) आपली लग्नगाठ बांधली. आता हे काय? ही कुठली प्रथा? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. अनेकांना या लग्न पद्धतीबद्दल उत्सुकता आहे, जाणून घेऊयात भूत शुद्धी विवाह पद्धती म्हणजे काय? 

Continues below advertisement

लिंग भैरवी हे ईशा योग केंद्रात स्थित देवीचं एक दिव्य रूप आहे. तिला एक दिव्य स्त्रीशक्ती मानलं जातं. सद्गुरूंनी तिला विशेष उर्जेनं भरलं आहे. इथे भाविकांना मानसिक, शारीरिक आणि उर्जेच्या पातळीवर शांती आणि संतुलनाचा अनुभव येतो. याच ठिकाणी समंथा आणि राज यांचा विवाह 'भूत शुद्धी विवाह' पद्धतीनं पार पडला. 

'भूत शुद्धी विवाह' म्हणजे काय? (What Is Bhoot Shuddhi Vivah?)

इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, हा एक प्राचीन यौगिक विधी आहे. या विधीत नवरा-नवरीचं शरीर, मन आणि ऊर्जा पाच तत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांनी पूर्णपणे शुद्ध केलं जातं. भूत शुद्धी विवाहात पती-पत्नीदरम्यान खोल अध्यात्मिक आणि ऊर्जेचं नातं तयार होतं. असं मानलं जातं की या अनुष्ठानातून वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि अध्यात्मिक एकता निर्माण होते. 

Continues below advertisement

'भूत शुद्धी विवाह' पद्धतीत लग्न कसं लावलं जातं? (How Marriage Arranged Bhut Shuddhi Vivah Method?)

लग्नात लिंग भैरवी देवीची पूजा केली जाते. दाम्पत्य पवित्र अग्निच्या चारही बाजुंनी परिक्रमा करतात. मंदिरात देवीच्या समोर एकमेकांना आजीवन साथ देण्याची शपथ घेतली जाते. लग्नाचा हा सोहळा अत्यंत शांत, साधेपणानं आणि खासगीपद्धतीनं केला जातो. या लग्नात निकटवर्तीय आणि मित्रांचा समावेश असतो. 

ईशा सेंटरमध्ये तीन प्रकारचे पवित्र विवाह केले जातात. 'भूत शुद्धी विवाह', 'लिंग भैरवी विवाह' आणि 'वैभव विवाह'. यापैकी 'भूत शुद्धी विवाह' सर्वात पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. दरम्यान, वधू गर्भवती असल्यास हा विशेष विधी केला जात नाही. समंथा आणि राज यांनी 'भूत शुद्धी विवाह' केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कन्फर्म! समंथानं राज निदिमोरूनं गुपचूप उरकलं लग्नस; भरजरी साडीतले नवऱ्यासोबतचे PHOTO शेअर