Welcome to the jungle v/s dhamaal 4 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सध्या बऱ्याच सिनेमांचा बोलबाला सुरू आहे. 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the jungle) पासून ते 'अल्फा'पर्यंत, अनेक सिनेमांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.   सध्या 'धमाल 4' (Dhamaal 4)  हा सिनेमा प्रेश्रकांना सिनेमागृहापर्यंत खेचण्यात यशस्वी ठरला आहे.  तर, 'अल्फा'ला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे.  तर, अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाच्या कामगिरीतही मंदी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गुरुवारी कोणत्या सिनेमाने किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

गुरुवारी 'धमाल 4' या सिनेमाने किती कोटी कमावले? (Dhamaal 4 box office collection)

अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी अभिनीत 'धमाल 4' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे.  या कॉमेडी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे.   भारतात या सिनेमाने 6 दिवसांत 90 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  भारतात 7 व्या दिवशी या सिनेमाने 96 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. तर, गुरुवारी या सिनेमाने  6 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

'अल्फा'च्या कमाईत घट का झाली?

आलिया भट्ट आणि शरवरी अभिनीत 'अल्फा' या सिनेमाच्या कमाईत ओपनिंग विकेंडपासून घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,    'अल्फा'ने 14 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी या सिनेमाने 60 लाखांचं कलेक्शन केलं आहे.   मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने  एकूण 14 दिवसांत  56.40 कोटींचे कलेक्शन केले आहे. या सिनेमाच्या कमाईच घट होत असल्यामुळे या चित्रपटाच्या मेकर्सना  धक्का बसला आहे.

Continues below advertisement

'धमाल 4'मुळे 'वेलकम टू द जंगल'ला धक्का

'धमाल 4'च्या प्रदर्शनाचा झटका 'वेलकम टू द जंगल'ला बसला आहे. या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.  21 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या गुरुवारी या सिनेमाने  50 लाखांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. या सिनेमाच्या एकूण कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने एकूण 21 दिवसांत 131.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.  माहितीनुसार, हा सिनेमा 125 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. दरम्यान, या सिनेमाने बजेट वसूल कमाई केली असून, हा सिनेमा लवकरच 150 कोटींचा टप्पा पर करेल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...