Web Series  : ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे लोकांना कंटेटची कोणतीही कमतरता नाही. ओटीटीवर तुम्हाला असंख्य चित्रपट, शो, रिअ‍ॅलिटी शो आणि वेब सिरीज पाहायला मिळतात. ओटीटीवर सर्व प्रकारचा कंटेंट उपलब्ध आहे. काही कंटेंट इतके बोल्ड असतात की ते चुकूनही कुटुंबीयांसोबत किंवा लहान मुलांसमोर पाहण्याची चूक करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही वेब सिरीजबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही आपल्या कुटुंबासोबत पाहणं टाळावं, अन्यथा अडचणीत सापडू शकता.

Continues below advertisement

1. Lust Stories (Netflix)

नेटफ्लिक्सवर 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाने भारतीय सिनेमात बोल्ड विषयांवर नवा वाद निर्माण केला. या चार वेगळ्या कथा असलेल्या अँथोलॉजीमध्ये लैंगिकता, इच्छा, नाती आणि सामाजातील ढोंगीपणावर मोकळेपणाने भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर, अनुराग कश्यप, जोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे.‘लस्ट स्टोरीज’ ही महिलांच्या इच्छा आणि त्यांचं लैंगिक आयुष्य मांडणारी एक प्रभावी कलाकृती आहे. या अँथोलॉजीला ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडून ‘A’ सर्टिफिकेट मिळालं आहे.

2. आश्रम (Amazon Prime)

बॉबी देओल यांची वेब सिरीज ‘एक बदनाम आश्रम’ने ओटीटी जगतातील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या मालिकेत त्यांनी बाबा निरालाची भूमिका साकारली आहे. वरून धार्मिक आणि समाजसेवी भासणारा बाबा, प्रत्यक्षात महिलांचा शोषण करणारा, सत्तेचा लोभी आणि भ्रष्ट व्यक्ती आहे. ‘आश्रम’चा पहिला सिझन 2020 साली MX Player वर आला आणि त्यानंतर या मालिकेची लोकप्रियता इतकी वाढली की पुढील सिझन्सही लगेच प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये त्रिधा चौधरी, अदिती पोहनकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Continues below advertisement

3. Four More Shots Please (Amazon Prime)

‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ ही Amazon Prime वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे. शायनी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, मानवी गगरू, आणि प्रतीक बब्बर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेचं दिग्दर्शन अनु मेनन आणि नुपुर अस्थाना यांनी केलं आहे. ही सिरीज महिलांच्या लैंगिकतेबाबत मोकळेपणाने बोलते आणि त्यामध्ये अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे ही सिरीज कुटुंबासोबत पाहणं टाळावं.

4. Made in Heaven (Amazon Prime)

‘मेड इन हेव्हन’ ही वेब सिरीज लग्नासारख्या ‘पवित्र बंधन’वर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या मालिकेत विवाहात होणारे फसवेगिरी, अफेअर्स, हुंड्यासाठी होणारा महिलांवरील अत्याचार, आणि समलैंगिकता यांसारख्या गंभीर मुद्द्यांचा परखड वेध घेतला आहे. ही सिरीज अनेक प्रसंगी अस्वस्थ करणारी आहे आणि ती समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूंना उजेडात आणते.

5. रसभरी (Swara Bhaskar – Amazon Prime)

स्वरा भास्करची वेब सिरीज ‘रसभरी’ एका किशोरवयीन मुलाच्या प्रेमकथेवर आधारित आहे, ज्याला आपल्या वर्गातल्या विद्यार्थिनीऐवजी आपल्या सुंदर इंग्रजी शिक्षिकेवर प्रेम जडतं. स्वरा भास्कर यात मुख्य भूमिका साकारते, जिच्या मोहक अदा विद्यार्थ्यांना भुरळ घालतात.

6. RejctX (Zee5)

ZEE5 ची ‘RejctX’ ही एक अ‍ॅडल्ट ड्रामा सिरीज आहे, जी कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवनातील नातेसंबंध, भावना आणि संघर्षांवर आधारित आहे. या मालिकेत प्रेम, मैत्री, करिअरचा दबाव आणि सोशल मीडियाचा प्रभाव यासारख्या मुद्द्यांची मांडणी केली आहे. मात्र यामध्ये भरपूर बोल्ड आणि इंटिमेट सीन दाखवले गेले आहेत, जे ही सिरीज प्रचंड सिझलिंग बनवतात. ही सर्व सिरीज त्यांच्या बोल्ड संवाद आणि सीन्समुळे लोकप्रिय आहेत. मात्र त्यातील विषय आणि मांडणीमुळे त्या कुटुंबासोबत पाहणं टाळावं, अन्यथा अनेकदा असहजता निर्माण होऊ शकते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर पुन्हा एकत्र येणार, कलर्स मराठीने शेअर केला खास व्हिडीओ