4 एपिसोडवाली वेबसिरीज, गावाला वाचवण्यासाठी कुटुंबातील लोक गमावतो हिरो; थरकाप उडवणारा क्लायमॅक्स

Web series : जर तुम्हाला हॉरर-थ्रिलर चित्रपट आणि वेबसिरीज पाहाण्याची आवड असेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका वेबसिरीजबद्दल सांगणार आहोत. ही मालिका शाहरुख खान आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने तयार केली होती. 'मुक्काबाज' फेम विनीत कुमार या मालिकेत मुख्य भूमिकेत होता.

Continues below advertisement

Web series : ग्रामीण भागात शूट केलेल्या ‘पंचायत’, ‘सरपंच साहेब’ आणि ‘जय महेंद्रन’ यांसारख्या वेब सिरीजना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सिरीजमध्ये विनोद आणि ड्रामा भरपूर प्रमाणात पाहायला मिळालं. मात्र आता आम्ही तुम्हाला एका अशा वेब सिरीजविषयी सांगणार आहोत जी गावात शूट करण्यात आली आहे, पण त्यात ना विनोद आहे ना ड्रामा.

Continues below advertisement

ही सिरीज गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित असली तरी ती मायथॉलॉजिकल-हॉरर-थ्रिलर प्रकारात मोडते. या सिरीजचं नाव आहे ‘बेताल’. या सिरीजमध्ये विनीत कुमार सिंग मुख्य भूमिकेत आहे, तर आहाना कुमरा यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘बेताल’ ही चार भागांची एक छोटी वेबसिरीज आहे. कथानक एका दुर्गम गावाभोवती फिरतं, जिथे सरकार एक मोठा प्रकल्प राबवण्यासाठी खोदकाम करणार असते. मात्र गावकरी त्या खोदकामाला विरोध करतात.

गावकऱ्यांचा विरोध पाहून सरकार तिथे काही सैनिकांना पाठवते. विनीत कुमार सिंग यांचा कमांडर विक्रम सिरोही नावाचा पात्र या पथकाचं नेतृत्व करत असतो. विक्रम एका भ्रष्ट व्यावसायिकाशी संगनमत करून गावकऱ्यांना जबरदस्तीने स्थलांतरित करण्याच्या कामात गुंततो.

विक्रमला हे माहीत नसतं की ज्या बोगद्याचं खोदकाम तो करतोय, त्यात काही भयानक शक्ती वसलेल्या आहेत. खोदकामादरम्यान तिथून ब्रिटिश कर्नलच्या नेतृत्वाखालील झॉम्बी सैन्य जागं होतं. हे झॉम्बी विक्रमच्या अनेक सहकाऱ्यांना ठार मारतात.

विक्रम सिरोही आणि त्याचे उरलेले साथीदार या झॉम्बी सैन्याशी लढा देतात आणि आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतात. विक्रम त्या बोगद्यातील झॉम्बी सैन्याचा नायनाट करतो, पण दुसऱ्या बॅरकमधून येणाऱ्या झॉम्बींचा मुकाबला त्याच्या टीमला अधिक कठीण वाटतो.

या झॉम्बींशी लढण्यासाठी गावकरी विक्रमच्या मदतीला येतात. अखेरच्या टप्प्यात, ब्रिटिश कर्नलचा मंदिरात नाश होतो आणि गावातील एका मुलीची सुटका होते. ‘बेताल’ सिरीजला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला होता.

ही चार भागांची वेब सिरीज मे 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. या सिरीजचं दिग्दर्शन पॅट्रिक ग्रॅहम आणि निखिल महाजन यांनी केलं होतं. सिरीजला IMDb वर 5.8 रेटिंग मिळालं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shefali Jariwal Husbnad Parag Tyagi Post Viral: शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पतीची पहिली पोस्ट, 'माझी परी' म्हणत पराग त्यागीची चाहत्यांना कळकळीची विनंती, बायकोबाबत नेमकं काय म्हणाला?

राम कृष्ण हरी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने गौतमी पाटीलची खास पोस्ट

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola