Vivek Bberoi Play Aurangzeb Roll: आजवर बॉलिवूडच्या (Bollywood News) अनेक सिनेमांमध्ये खुंखार मुघल बादशाह औरंगजेबाची (Mughal Emperor Aurangzeb) कहाणी दाखवण्यात आलीय. नुकत्याच आलेल्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांच्या 'छावा' सिनेमातही औरंगजेबाचा क्रूरपणा दाखवण्यात आलेला. या सिनेमात औरंगजेब बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नानं पडद्यावर साकारलेला. अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता अक्षय खन्नानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता औरंगजेबची (Aurangzeb) भूमिका साकारण्याची तयारी करत आहे. ऐश्वर्या रायचा एक्स आता आगामी सिनेमात मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे.                         

Continues below advertisement


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Chapter 1) नंतर ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) त्याच्या आगामी 'द प्राइड ऑफ इंडिया: छत्रपती शिवाजी महाराज' (The Pride of Bharat - Chhatrapati Shivaji Maharaj) या चित्रपटासाठी चर्चेत आहे. आता, या चित्रपटात एका नव्या सुपरस्टारची एन्ट्री होणार आहे. ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड आता या सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. तर, अभिनेत्री शेफाली शाह राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


औरंगजेब कोण साकारणार?


झूमच्या एका विशेष अहवालानुसार, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटात बॉलिवूड स्टार विवेक ओबेरॉय मुघल सम्राट औरंगजेबची भूमिका साकारणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सिंहचा आगामी ऐतिहासिक चित्रपट 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज'मध्ये औरंगजेबची भूमिका विवेक ओबेरॉय साकारणार आहे. अशातच, आता विवेक ओबेरॉयची औरंगजेबाच्या भूमिकेतील एंट्री आणि मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील ऐतिहासिक संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.






हे वृत्त समोर आल्यानंतर विवेक ओबेरॉयचे चाहते खूप खूश आहेत. पण, अद्याप अधिकृतपणे मेकर्सनी यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. असं म्हटलं जातंय की, लवकरच मेकर्स फिल्मच्या स्टारकास्टबाबत खुलासा करू शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Salman Khan In Riteish Deshmukh Raja Shivaji Marathi Movie: होता जीवा म्हणून वाचला शिवा... रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खान साकारणार 'जिवा महाला'