Vishal Kotians Decision Set to Shake Bigg Boss Marathi House: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात खेळाला एक नवं वळण मिळालं आहे. प्रत्येक आठवड्यात नवा टास्क पाहायला मिळत आहे, हा खेळ आता अधिकच रंचक होत चालला आहे. या खेळातून आतापर्यंत 4 स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. या आठवड्यात नेमकं कोण  आऊट होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, बिग बॉसच्या या खेळात स्पर्धकांना अशी एक संधी मिळणार,  जी संपूर्ण समीकरणे बदलू शकते. स्पर्धक विशाल कोटियनला गेम पालटवायची सु्वर्णसंधी मिळणार आहे. विशाल घरातील एखाद्या सदस्याची ताकद काढून घेऊ शकतो.

Continues below advertisement

बिग बॉसच्या खेळात आता नवं वळण आलं आहे. विशाल कोटियनला   पॉवर KEY काढून घेण्याची संधी मिळणार आहे. तो घरातील कोणत्याही एखाद्या सदस्याची ताकद काढून घेऊ शकतो. पण प्रश्न हा आहे की तो नेमकं कुणाची पॉवर KEY काढून घेणार? घरातील समीकरणं, मैत्री, मतभेद आणि रणनीती या सगळ्यांवर या एका निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे. विशालचा हा निर्णय कोणाला अडचणीत टाकणार? आणि कोणासाठी ठरणार धोक्याची घंटा? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

या गेम-चेंजिंग ट्विस्टमुळे घरात नवा वाद, नवी चर्चा आणि नवा ड्रामा पाहायला मिळणार एवढं मात्र, नक्की. पुढे नेमकं काय होणार? या खेळात कुणाची पॉवर कमी होणार? दरम्यान, प्रेक्षक बिग बॉस मराठीचा हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

Continues below advertisement

बिग बॉसच्या घरात राखीची एन्ट्री

 

 मनोरंजनाचा तडका लावण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात एका स्पर्धकाची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्याची पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात राखी सावंतने एन्ट्री घेतली. तिनं पहिल्याच दिवशी हटके कपडे परिधान केले होते. तिनं सोनेरी रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला होता. तसेच डोक्यावर सोनेरी रंगाचा मुकूट पाहायला मिळाला. राखीनं नागिन  लूक कॅरी केला होता. घरात एन्ट्री घेताच 'तन्वी कोलते, थांब आता तुला मी सोलते', असं म्हणत तिनं तन्वीची शाळा घेतली. राखी सावंतची घरात एन्ट्री होताच, ड्रामा आणि धमाका पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की.