Virat Kohli First Crush Actress: टीम इंडियाची (Team India) रन मशीन स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) किर्ती अख्खा जगभरात पसरली आहे. जगातील स्टार क्रिकेटपटूंपैकी आघाडीच्या काही नावांमध्ये विराट कोहलीचं नाव दिमाखात घेतलं जातं. विराटनं बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) अनुष्कासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. चाहत्यांचं आवडतं सेलिब्रिटी कपल म्हणजे, विरुष्का. दोघांना आता दोन गोंडस मुलंही आहे. चाहत्यांच्या दृष्टीनं एकदम आयडीयल कपल म्हणून विराट-अनुष्काकडे पाहिलं जातं. पण, तुम्हाला माहिती आहे का? अनुष्का शर्माच्या आधी विराटचे हृदय दुसऱ्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीसाठी धडधडत होतं. ती अभिनेत्री कोण? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, जाणून घेऊयात सविस्तर... 

Continues below advertisement


विराट कोहली ज्या अभिनेत्रीवर भाळला होता, आज ती एका अभिनेत्याची पत्नी आणि महाराष्ट्राच्या माजी दिवंगत मुख्यमंत्र्यांची सून आहे. विराटला आवडणारी ती बॉलिवूड अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून अभिनेता रितेश देशमुखची स्टार पत्नी जेनिलिया डिसूझा आहे. 


जेनिलियावर भाळलेला विराट कोहली 


विराट कोहली जेनिलिया डिसूझावर भाळलेला, हे आम्ही नाहीतर स्वतः विराट कोहलीनं उघड केलं होतं. एका मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये बोलताना विराट कोहलीनं स्वतः याबाबत खुलासा केला होता. मुलाखतीत विराट कोहलीला विचारण्यात आलं की, त्याला कोणत्या अभिनेत्रीला क्रिकेट खेळताना पाहायला आवडेल? पण, लाजून, फिरवून उत्तर देईल तो विराट कसला. 


विराटनं कोणताही संकोच न बाळगता, कोणताही मागचा-पुढचा विचार न करता थेट जेनिलिया डिसूझाचं नाव सांगितलं. बरं विराट एवढ्यावर थांबला नाही, जेनिलिया खूपच क्युट आहे, असंही तो म्हणालेला. विराटच्या या बोलण्यानंतर विराटच्या मनात जेनिलिया असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. आज दोघांनीही आपापले संसार थाटले आहेत. दोघांनाही मुलं आहेत. पण, त्यावेळी मात्र, जेनेलिया विराटच्या दिलाची धडकन होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जेनिलियानं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा मुलगा आणि बॉलिवूड स्टार रितेश देशमुखसोबत 2012 मध्ये आपली लग्नगाठ बांधली. तर, 2017 मध्ये विराटनं अनुष्काशी लग्न केलं. 


दरम्यान, जेनिलियाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करतेय. हा चित्रपट आज, म्हणजेच 20 जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जेनिलिया एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी जेनिलिया 'ट्रायल पीरियड' (2023) या चित्रपटात दिसली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'जब वी मेट'मधली करीनाची बहीण, 18 वर्षांनी इंडस्ट्रीची टॉप हिरोईन; आज थेट ऐश्वर्या रायसोबत तुलना, शाहीद कपूरच्या मागे असलेल्या सुपरस्टारला ओळखता का?