Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हिंदू धर्मात तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा आणि खरेदी करणाऱ्यांना त्याचा विशेष लाभ होतो. मात्र यंदा अक्षय्य तृतीयेला भद्रा, राहुकाळाचं सावट असणार का? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तसं पाहायला गेलं तर राहु काळ आणि भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. या काळात केलेल्या कामाचे शुभ फळ मिळत नाही. जाणून घ्या तिथी, पूजेची नेमकी वेळ, आणि सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त...
अक्षय्य तृतीयेचा सण कधी साजरा केला जाईल?
वैदिक पंचागानुसार, अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीया तिथीला साजरा केला जाईल. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. यावर्षी, तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 05:31 वाजता सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी दुपारी 02:12 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, यंदा अक्षय्य तृतीया हा सण बुधवारी, 30 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल. अशात प्रश्न असा पडतो की, यंदा अक्षय्य तृतीयेला भद्रा, राहुकाळाचं सावट असणार का? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे
अक्षय्य तृतीयेला भद्रा आणि राहुकाल कधी असेल?
धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा आणि खरेदी करणाऱ्यांना त्याचा विशेष लाभ होतो. मात्र धार्मिक मान्यतेनुसार, राहुकाल आणि भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. यावेळी केलेल्या कामाचे शुभ फळ मिळत नाही. वैदिक कॅलेंडरच्या गणनेनुसार, यावेळी अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी भद्रा दिसत नाही. तर राहुकाल दुपारी 12:18 ते दुपारी 1:58 पर्यंत आहे. राहुकाल वगळता 30 एप्रिल रोजी कोणत्याही शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ राहील.
अक्षय्य तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त
वैदिक पंचागानुसार, 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 05:41 ते दुपारी 12:18 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. तर या दिवशी अभिजित मुहूर्त नाही. अक्षय्य तृतीयेला अमृत काल दुपारी 01:25 ते 02:51 पर्यंत असेल. याशिवाय बुधवारी पहाटे 04:21 ते 05:09 पर्यंत ब्रह्म मुहूर्त आहे.
अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त
वैदिक पंचागानुसार, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त 05:41 ते दुपारी 02:12 पर्यंत आहे.
हेही वाचा :