Vijay Deverakonda and Rashmika Mandanna wedding card viral truth: मनोरंजनसृष्टीतून एक आनंदाची बातमी.  साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना  यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं.  दोघांनी अगदी गुपचूप साखरपुडाही उरकला असल्याची माहिती आहे. दरम्यान, दोघांनीही अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची घोषणा केलेली नाही. अलिकडे, दोघेही 2 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु, त्या केवळ अफवा ठरल्या.  दरम्यान, आता त्यांचे वेडिंग कार्ड सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हायरल कार्डमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील. 

Continues below advertisement

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात या जोडप्याचा साखरपुडा पार पडला असल्याची बातमी समोर आली होती. यानंतर दोघांच्या लग्नाच्या बातमीनं जोर धरला होता. दोघांनी  अद्याप कोणतीही  अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान आता विजय आणि रश्मिका यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि पुत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार,  विजय आणि रश्मिका 26 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहेत.  विजय आणि रश्मिका यांच्या लग्नाला कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.  तर, 4   मार्च रोजी हैदराबादमधील एका भव्य हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार आहे.

लग्न पत्रिकेत नेमकं काय लिहिलं आहे?

 

Continues below advertisement

व्हायरल होत असलेल्या पत्रिकेच्या सुरुवातीला विजय देवरकोंडा असे लिहिले आहे.  कार्डवरील मजकूर असा आहे की, "मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी आणि आमच्या आयुष्यातील अत्यंत खास क्षणाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी हे पत्र लिहित आहे. आमच्या कुटुंबियांच्या प्रेम आणि आशीर्वादाने रश्मिका आणि मी 26.02.2026 रोजी एका छोट्या आणि खासगी समारंभात विवाहबंधनात अडकत आहोत"

"आमच्या आयुष्यातील या नव्या अध्यायाची सुरुवात करताना, सुंदर आठवणी निर्माण करताना, आमच्या प्रवासाचा भाग राहिलेल्या सर्वांसोबत हा आनंद वाटण्याची आमची मनापासून इच्छा आहे.  तुमची उपस्थिती आणि आशीर्वाद आमच्यासाठी हा क्षण अधिक खास आणि अविस्मरणीय ठरवतील".

वृत्तानुसार, विजय आणि रश्मिकाच्या लग्नाला फक्त काही जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.  दरम्यान, अद्याप या जोडप्याने अधिकृतपणे कोणतीही माहिती  दिलेली नाही.