मुंबई : 'ओ सनम', 'गोरी तेरी आखियाँ' या गाण्यांनी भारतातीलच नव्हे तर, जगभरातील प्रेक्षकांच्या स्मृतीत आणि आपसूक ओठांवर जागा मिळवणाऱ्या 90 च्या दशकात ही गाणी गाऊन संगीत रसिकांच्या मनावर राज्य करणारा एक गायक जगापासून कायम अलिप्त होता. मात्र नफिसा अली सोढी या अभिनेत्रीने गोव्यातील हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.


सोशल मीडियावर लकी अली यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते स्वतःचं एक प्रसिद्ध गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हायरल होणारा व्हिडिओ गोव्यातील असून सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नफीसा अली सोढी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत लकी अली ओ सनम' हे गाणं गाताना दिसत आहेत.





तरुणांच्या घोळक्यात लकी अली गिटार वाजवत गाणं गात असतानाचा हा व्हिडीओ अनेकांनी त्यांच्या मोबाइलध्ये कैद केलाय. व्हिडिओ मध्ये लकी 'मर भी गए तो...' ही ओळ म्हणून थांबतात. तर उपस्थित चाहते 'भूल ना जाना' ही ओळ म्हणत गाणं पूर्ण करताना दिसत आहेत. पांढरी दाढी वाढलेले लकी अली तरूणांच्या या घोळक्यात आपली गाणी गाताना रंगून गेलेले आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच याला लाखो लाईक्स मिळाले. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मिडीयावर अनेकांनी शेअर केला आहे.