Vicky Kaushal : मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज मुंबईच्या दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने मराठीतील कवी कुसुमाग्रज यांची 'फक्त लढ म्हणा' ही म्हटली आहे. दरम्यान, छावा या सिनेमामुळे आणि संभाजी महाराजांमुळे 'कणा' हा शब्द समजला असल्याचंही कौशल म्हणाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गायक आशा भोसले, जावेद अख्तर, सोनाली बेंद्रे, रितेश देशमुख अशी बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थित होती.
दहावीत मराठीत जास्त मार्क मिळाले होते, इंग्रजीत कमी मिळाले होते - विकी कौशल
विकी कौशल म्हणाला, नमस्कार...जय भवानी, जय शिवराय... खरं सांगू तर मी खूप नरव्हस फिल करतोय. मी मराठी बोलू शकतो. मी दहावीपर्यंत मराठी शिकली आहे. दहावीत मराठीत जास्त मार्क मिळाले होते, इंग्रजीत कमी मिळाले होते. मात्र, इतकी चांगली बोलू शकत नाही. त्यामुळे चूकभूल माफ करा. जावेद साहेबांनंतर इथे येण आणि तेही मराठीत कविता म्हणणे...म्हणजे हा आयुष्यातील सर्वांत नरव्हस क्षण आहे.
मी राज ठाकरे सरांचे आभार मानतो - विकी कौशल
पुढे बोलताना विकी कौशल म्हणाले, नॉन महाराष्ट्रीयन असताना ज्यांचं शिक्षण महाराष्ट्रात झालंय. जो काम महाराष्ट्रात करतोय. त्याचं आज या शिवाजी पार्कवरील व्यासपीठावर असणं...मराठी भाषा दिनानिमित्ताने हा माझ्यासाठी महान दिवस आहे. मी राज ठाकरे सरांचे आभार मानतो त्यांना मला हा मान दिला. मी इथे बसलो होतो, सर्वजण कवित म्हणत होते. आशाताईंनी मला विचारलं तुम्ही पण कविता वाचणार काय? मी म्हणलो हो...त्यानी विचारलं मराठीमध्ये...मी म्हटलो हो...आशा मॅम म्हटल्या..तोबा..तोबा..