Katrina Kaif Pregnancy Prediction: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांच्याकडे गूड न्यूज असून लवकरच कौशल कुटुंबाच्या घरात पाळणा हलणार आहे. काही दिवसांपूर्वीच जोडप्यानं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. पण, कतरिना आणि विक्कीला मुलगा होणार की, मुलगी? याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच, प्रसिद्ध ज्योतिषानं त्याबाबत भाकीत वर्तवलं आहे. कतरिना आणि विक्कीच्या येणाऱ्या बाळाबाबत वर्तवलेल्या भाकीतामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

Continues below advertisement

कतरिना-विक्कीकडून प्रेग्नंसी अनाउंस  

कतरिना कैफ आणि विक्की कौशल (Katrina Kaif & Vicky Kaushal) यावर्षी लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये, त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमार्फत चाहत्यांना याबाबत माहिती दिली. कतरिना आणि विक्कीनं सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये लिहिलेलं की, "आनंद आणि कृतज्ञतेनं आपल्या आयुष्यातील सर्वात अद्भुत अध्याय सुरू करतोय..."

जरी कतरिनाच्या प्रसूतीची तारीख अद्याप माहीत नसली तरी, मीडिया रिपोर्टनुसार, हे जोडपं ऑक्टोबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करू शकतात.

Continues below advertisement

विक्की-कतरिनाला मुलगा होणार की मुलगी? 

विक्की कौशल आणि कतरिना कैफ लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. अशातच प्रसिद्ध ज्योतिषी अनिरुद्ध कुमार मिश्रा नावाच्या एका ज्योतिषानं भाकीत केलंय की, या जोडप्याला मुलगी होईल. त्यांनी ट्विट केलंय की, "विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचं पहिलं अपत्य हे मुलगी असेल..."

प्रसिद्ध ज्योतिषाकडून विक्की-कतरिनाच्या बाळाबाबत खुलासा

प्रसिद्ध ज्योतिषी अनिरुद्ध कुमार मिश्रा नावाच्या एका ज्योतिषानं मोठी भविष्यवाणी केली आहे. ज्योतिषाचं म्हणणं आहे की, विक्की आणि कतरिना यांना कन्यारत्न होणार आगे. त्यांनी ट्विट केलंय की, "कतरिना आणि विक्कीचं पहिलं अपत्य हे मुलगी असेल..." 

आपल्या ट्विटर अकाउंटवर ज्योतिषांनी एक ट्विट पिन केलं आहे आणि ज्यामध्ये त्यांनी आपल्या आधीच्या भविष्यवाण्यांचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले आहेत. त्यामध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या मुलीबाबत आणि सैफ अली खान-करिनाचा दुसरा मुलगा जेहबाबत भविष्यवाणी केली आहे. 

एका नेटकऱ्यानं ट्वीट केलंय की, "ही भविष्यवाणी खरी ठरण्याची 50 टक्के शक्यता आहे..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "मुलगा की मुलगी... दोघांपैकी कोण होणार? याची शक्यता 50/50 टक्केच असते... जर त्यांनी केलेलं भाकीत खरं ठरलं, तर ते हे पिन करतील नाहीतर, हे त्यांच्या रॉन्ग ट्वीट्सच्या लायब्ररीमध्ये जाईल.", तर अजून एका नेटकऱ्यानं लिहिलंय की, "सध्या मुलींचं सीझन सरू आहे, त्यामुळे विक्की-कतरिनाला मुलगीच होणार आहे..."