Vicky Kaushal Chhaava Movie : बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) येत्या 14 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिकेत बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor)) विक्की कौशल (Vicky Kaushal), तर महाराणी येसुबाईंच्या (Maharani Yesubai) भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. अशातच आता चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. अशातच चित्रपटाची संपूर्ण क्रू प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता विक्की कौशल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूरमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्यानं रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांना साकारण्यासाठी किती कठोर मेहनत घेतली, याबाबत सविस्तर माहिती दिली. 


मंगळवारी (4 फेब्रुवारी 2025) जयपूरमध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनं ढोलकीच्या तालावर नृत्य केलं. त्याचा आगामी चित्रपट 'छावा'च्या प्रमोशनसाठी जयपूरला आलेल्या विक्कीनं सांगितलं की, या चित्रपटासाठी त्यानं 25 किलो वजन वाढवलं. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.


विक्की कौशलनं 'छावा'मधील महत्त्वाच्या भूमिकांबाबत बोलताना सांगितलं की, त्यानं तब्बल 7 महिने त्याच्या शरीरावर काम केलं. तो म्हणाला की, "जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा मला समजत नव्हतं की, मी ही भूमिका कशी करू शकेन. माझ्या दिग्दर्शकांनी मला सांगितलं की, मला यामध्ये सिंहासारखं दिसावं लागेल. हे कसं शक्य होईल? याची सतत मला काळजी वाटत होती. मी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो पाहिला, ते अगदी सिंहासारखेच दिसत होते. त्यांच्यासारखं देखणं आणि रुबाबदार सिंहासारखं दिसणं मला कसं शक्य होणार? मी म्हणालो, मला शक्य होणार नाही. पण, त्यानंतर मी स्वतःलाच आव्हान दिलं आणि ते स्विकारलं... 7 महिने मी माझ्या शरीरावर काम केलं आणि तब्बल 25 किलो वजन वाढवलं. या चित्रपटाची तयारी चार वर्षांपूर्वी सुरू झाली होती. टीम स्क्रिप्टवर संशोधन करत होती. पटकथेवर जवळजवळ अडीच वर्ष काम सुरू होतं. मी माझं शरीर तयार करण्यात, वजन वाढवण्यात आणि घोडेस्वारी शिकण्यात 7 महिने घालवले. त्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण तब्बल 7 महिने चाललं."




जयपूरमध्ये बोलताना विक्की कौशलनं आपलाही मराठा इतिहासाशी संबंध असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, "मी महाराष्ट्राचा आहे. लहानपणापासून मी शालेय पुस्तकांमध्ये मराठ्यांचा इतिहास वाचला आहे. म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला नेहमीच आदर आणि सन्मान होता. पण, छत्रपती शिवरायांसोबतच त्यांचे पुत्र संभाजी महाराज देखील एक महान योद्धा होते. त्यांच्या व्यक्तिरेखेवर काम करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Vicky Kaushal Chhaava Movie: राज्याभिषेकाचा सीन, दरबार भरला, पण सिंहासनावर बसण्यापूर्वी विक्कीच्या डोळ्यांत पाणी...; 'त्या'वेळी नेमकं काय घडलं?