Vicky Kaushal Chhaava Movie : विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत आगामी 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला छावा (Chhaava Release Date 14th February) देशभरात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'छावा' (Chhaava) चित्रपटाच्या घोषणेपासूनच शीवप्रेमींमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. अशातच या चित्रपात बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिकेत, तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या (Maharani Yesubai) भूमिकेत दिसणार आहे. सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar), विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच, एका मुलाखतीत बोलताना विकी आणि लक्ष्मण उतेकरांनी छावाच्या शुटिंगदरम्यानच्या भावनिक करणाऱ्या क्षणांचा उल्लेख केला. 

Continues below advertisement

आगामी चित्रपट छावाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, विक्की कौशल यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी दोघांनीही छावाच्या शुटिंगदरम्यानचे अनुभव, थरारक, अंगावर शहारे आणणारे किस्से सांगितले. मुलाखतीवेळी विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकरांना सेटवरच्या भावनिक प्रसंगाबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरानी छत्रपती संभाजी राजांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याचं दृश्य चित्रित करतानाचा सेटवर घडलेला डोळ्यांच्या कडा पाणावणारा प्रसंग सांगितला. 

सेटवरच्या भावनिक प्रसंगांबाबत बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले की, "आम्ही रायगडाचा सेट फिल्मसिटीला हेलिपॅडवर तयार केला होता. यासाठी आमचे प्रोडक्शन डिझायनर प्रत्यक्षात रायगडावर गेलेल आणि रिसर्च करून अगदी हुबेहुब तो सेट तयार केला होता. त्या काळात महाराजांचा दरबार जसा असेल, अगदी जसाच्या तसा तो दरबार त्यानी साकारला होता. त्यावेळी छत्रपती संभाजी राजांचा राज्याभिषेकाचा सीन शूट करायचा होता. त्या शूटच्या वेळी सेटवर 700 ते 800 लोक उपस्थित होते आणि राजे सिंहासनावर जाऊन बसतात, असा सीन आम्ही शूट करू लागलो. आम्ही सेटवर कोणताच शॉट दोन ते तीन टेकच्या पुढे घेतला नव्हता. विक्की आणि माझ्यात याबाबत खूपच चांगलं इक्वेशन आहे, त्यामुळे अनेकदा आम्ही डोळ्यांनीच बोलतो. पण, त्या सीनसाठी आम्हाला 15 टेक घ्यावे लागले. सिंहासनाला पाहून ज्या मार्कवर उभं राहायचं होतं, तिथे उभं राहून विक्कीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं."

Continues below advertisement

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की, "राजा हा राजा असतो, तो प्रजेसमोर रडू शकत नाही. म्हणून मी विक्कीला सारखं सांगत होतो. मला डोळ्यांत पाणी नकोय. शेवटी विक्की माझ्याजवळ आला आणि त्यानं मला कडकडून मिठी मारली. तो माझ्या गळा पडून अदी ढसाढसा रडला. मला म्हणाला, सर मला माहिती नाही पण, माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नाहीये. मग आम्हाला समजलं... तो तोच दिवस होता ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्या दिवशी सेटवरच्या दरबारात असणारे 700 ज्युनियर्स, अॅक्टर्स आणि प्रत्येक क्रू मेंबर रडत होता. मी, विक्की, रश्मिका आम्ही सगळेजण रडत होतो. संपूर्ण चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तो क्षण सर्वाधिक भावूक करणारा होता."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Action Director Struggle Life: अ‍ॅक्शन फिल्मचा सीक्रेट सुपरहिरो, कधीकाळी करायचा 350 रुपये महिना पगाराची नोकरी, आज बॉलिवूडमध्ये चालतं याच्याच मुलाचं नाणं