Playback Singer Jamuna Rani Passes Away: संगीत विश्वातून (Music Industry) एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ दक्षिण भारतीय पार्श्वगायिका जमुना राणी (Jamuna Rani) यांचं निधन झालं आहे. बंगळूरू येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 88 व्या वर्षी त्यांचं निधन (Singer Death) झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच भाषांमध्ये गाणी गायली आहेत (Entertainment). जमुना राणी यांनी तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत गाणी गायली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 6000 हून गाण्यांना आपला सुमधूर आवाज दिला आहे. 1950 ते 1960च्या दशकात यांच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सदाबहार गाणी गायली. जमुना राणी यांचे बंगळूरू येथील त्यांच्या घरी निधन झाले आहे.
जमुना राणी यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले? (Playback Singer Jamuna Rani Passes Away at 88)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार झालेल्या आजारामुळे जमुना राणी यांचं निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आहे. त्या बंगळूरू येथील आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर बंगळूरू येथील कल्लाहल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी सिनेविश्वातील मंडळी, त्यांचे कुटुंब उपस्थित होते.
1938 साली त्यांचा जन्म आंध्र प्रदेश येथे झाला होता. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी संगीत प्रवासाची सुरुवात केली. 1946 साली त्यांनी 'त्यागय्या'मधून प्लेबॅक सिगिंगच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1952 मध्ये त्यांनी 'कल्याणी' या सिनेमाद्वारे त्यांनी तामिळ सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या आवाजाला विशेष दाद मिळाली. ते अल्पावधीतच दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आवाजांपैकी एक बनल्या. जमुना राणी यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता कमल हसन यांच्या 'नायकन' या ब्लॉकबस्टर सिनेमासाठी गाणं गायलं.
जमुना राणी यांना भारतीय संगीतातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तामिळनाडू सरकारने त्यांना 1998 साली प्रतिष्ठित कलाइमामणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना अण्णा पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
