Salman Khan and Sanjay Dutt: सलमान खान(Salman Khan) आणि संजय दत्त(Sanjay Dutt) यांची मैत्रीतील बॉण्ड सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांचे बॉण्ड खूप घट्ट आणि अतूट आहे. दोघांचे हे नाते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. नुकतंच सलमान खानने (Instagram) आपल्या इन्स्टाग्रामवर संजय दत्तसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या भावनिक भेटीच्या फोटोवर सलमान खानने (Entertainment) लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी सलमान खान आणि संजय दत्तचं कौतुक केलं आहे.
सलमान खानची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Salman Khans Emotional Post for Sanjay Dutt goes viral)
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खान आणि संजय दत्त दिसत आहे. ते एकमेकांना घट्ट मिठी मारत असल्याचं दिसत आहे. सलमान खानने टी शर्ट आणि जीन्स घातली असून, सोबत डोक्यावर टोपी दिसत आहे. तर, संजय दत्त हा टी- शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. संजय दत्तचा पूर्ण चेहरा दिसत नसला तरी, तो संजय दत्त आहे, ते कळून येत आहे. दोघांमधील मैत्रीतील प्रेम स्पष्ट दिसत आहे.
सलमान खानने ही पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं की, 'बाबा हा नेहमी बाबाच असतो. संजू बाबा आपल्या सर्वांचाच बाबा आहे. तो आता आपल्या मुालांचाही बाबा आहे. माझा मोठा भाऊ संजय दत्त. अल्लाह, भगवान, यशू, सर्वांनी या व्यक्तीला सदैव सुखी ठेवोत. आय लव्ह यू बाबा...'., असं सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी दोघांच्या बॉण्डिंगचं विशेष कौतुक केलं आहे.
नेटकऱ्यांनी असा अंदाज वर्तवला की, आपल्या जिवलग मित्राच्या वाढदिवसाच्या काही दिवसानंतर सलमान खान भेटायला गेला होता. संजय दत्तचा वाढदिवस 29 जुलै रोजी होता. त्यामुळे अनेकांनी असा अंदाज बांधला की, सलमान खान संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही दिवसांनी भेटायला गेला होता. सध्या नेटकऱ्यांनी सलमान खानची ही हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केली आहे. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांचे जुने फोटो कमेंट सेक्शनमध्ये शेअर केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
