Renowned Production Designer K. Sekhar Dies: टॉलिवूड सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ कला दिग्दर्शक के. शेखर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, के. शेखर यांचे निधन तिरूअनंतपुरम येथील त्यांच्या घरात झाले आहे. केरळ कौमुदीने दिलेल्या वृत्तानुसार, निधनाच्या बातमीला के. शेखर यांच्या कुटुंबाने दुजोरा दिला आहे. के. शेखर यांच्या निधनानंतर मल्याळम सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. के. शेखर आपल्या कल्पनाशक्ती तसेच स्मार्ट सेट डिझाइनसाठी ओळखले जात होते. त्यांनी आतापर्यंत मल्याळम सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांसाठी खास सेट डिझाइन केले आहेत.
के. शेखर यांना प्रख्यात आर्ट डायरेक्टर/ प्रॉडक्शन डिझायनर म्हणून सर्वाधिक ओळखले जात होते. 'माय डिअर कुट्टीचाथन' या चित्रपटाचे दिग्दर्शन जिजो पुन्नूसे यांनी केले होते. मात्र, या चित्रपटाचे खास सेट्स के. शेखर यांच्या योगदानातून तयार झाले होते. या चित्रपटातील खास सेंट्सची चर्चा संपूर्ण सिनेसृष्टीत झाली. तसेच 'अलिप्पझम पेरूक्कान' या गाण्यात दिसणारी अँटी ग्रॅव्हिटी रूप ही के. शेखर यांचीच संकल्पना होती. विशेष म्हणजे ही खोली खास फिरत्या स्टील रिगवर बांधली होती. कॅमेरा स्थिर ठेवून संपूर्ण खोली फिरवली जात असल्यामुळे कलाकार हवेत तरंगत असल्याचा भास निर्माण झाला.
के. शेखर यांना आदरांजली
1980च्या दशकात हे तंत्र भारतीय चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व मानले जात होते. ही कल्पना स्टॅनी कुब्रिकच्या 2009 अ स्पेस ओडिसीमधून आली होती. के. शेखर यांनी 26 वर्षांपूर्वी कोणत्याही सीजीशिवाय हे केले होते. आजकाल अनेक चित्रपटांमध्ये हेच तंत्र वापरले जाते. के. शेखर यांनी 1980 साली मल्यळम चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. जिजो पुन्नूस दिग्दर्शित पदयोत्तम हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्या चित्रपटात त्यांन कॉस्चुम डिझालन आणि पब्लिसिटी डिझायनर म्हणून काम केले होते. नंतर त्यांनी 'नोक्केथाधूरथु कन्नूम नट्टू' आणि 'ओन्नू मुथल पूजाम वारे'सारख्या चित्रपटांसाठी काम केले.
'माय डिअर कुट्टीचाथन' या चित्रपटाबाबत न्यूज मिनिटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, 'सेट्स तरंगताना दिसत होते. ते मला प्रचंड आवडले. मला वाटत नाही की, अशा प्रकारचा दुसरा चित्रपट भारतात कधी बनवला जाईल'. दरम्यान, के. शेखर यांचे काम निर्मात्यांना आजही प्रेरणा देते. त्यांचे काम आणि विचार सिनेमाद्वारे कायमचे जिवंत राहतील. के. शेखर यांच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात असून, दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.