Veen Doghantali Hi Tutena Actress Poorva Gokhale: झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'वीण दोघांची ही तुटेना' (Veen Doghantali Hi Tutena) या मालिकेत एक नवं रंजक वळण आलेलं. मालिकेत समरची मैत्रीण 'किमया' आल्यामुळे कथानकात मोठी उलथापालथ झालेली. प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा गोखले (Poorva Gokhale) हिनं मालिकेत किमयाची भूमिका साकारलेली. किमयाच्या येण्यामुळे स्वानंदीला समरवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते. एका पार्टीत दारू पिऊन स्वानंदी समरसमोर तिच्या मनातील भावना, प्रेम भडाभडा बोलून टाकते. पण, इथेही ट्वीस्ट आहेच. समरला वाटतं स्वानंदी दारू प्यायलीय, त्यामुळे बडबडतेय आणि तो तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. पण, आता या मालिकेत मोठा ट्वीस्ट घेऊन आलेली किमया मालिकेतून एग्झिट घेणार आहे. आताच कुठे एन्ट्री घेतलेली अभिनेत्री लगेचच एग्झिट घेत असल्यामुळे चाहते कोड्यात पडले आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री पूर्वा गोखले (Poorva Gokhale) हिनं 'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेत एन्ट्री घेतली आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. या निमित्तानं प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबात परतली. किमया हे केवळ एक नवं पात्र नसून ती समरची जुनी मैत्रीण आणि त्याची Ex- गर्लफ्रेंड. परदेशातून भारतात परतल्यानंतर ती थेट समरच्या घरी राहायला येते, ज्यामुळे घरातील वातावरण आणि नात्यांची समीकरणे पूर्णपणे बदलून जातात. पण, आता हीच किमया मालिकेतून एग्झिट घेणार आहे. स्वतः पूर्वा गोखले हिनं याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे.
पूर्वा गोखले हिनं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट करत तिनं आपण मालिकेतून एग्झिट घेत असल्याचं सांगितलं आहे. खरंतर पूर्वाची मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून एन्ट्री झालेली. त्यामुळे काहीच एपिसोडसाठी आलेली किमया आता मालिकेतून एग्झिट घेणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या सेटवर केक कापून सेलिब्रेशन सुद्धा करण्यात आलंय. यावेळी पूर्वाला संपूर्ण मालिकेच्या टीमनं शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पूर्वानं तिच्या पोस्टमध्ये सेटवरचे काही न पाहिलेले फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.
पूर्वा गोखलेनं इन्स्टा पोस्टमध्ये काय लिहिलंय?
पूर्वा गोखलेनं इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय की, "किमया ही वादळासारखी येऊन मालिकेचा एक भाग झाली. या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ही भूमिका पाहुण्या कलाकाराची असल्यामुळे 15 दिवसांतच मी या मालिकेतून निरोप घेतेय... माझ्यावर सगळ्यांनी खूप प्रेम केलंय, मला आपलंसं केलं... मी सर्वांचे आभार मानते आणि तुम्हा सर्वांची मी ऋणी आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
