Budhaditya Rajyog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मे 2026 पर्यंतचा काळ 4 राशींच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, या 15 दिवसांत तुमच्या सुख समृद्धीतही चांगली भरभराट पाहायला मिळेल. कारण या कालावधीत धनसंपत्तीचा कारक शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार असल्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात कोणत्या राशी लकी ठरतील हे जाणून घेऊयात. 

द्रिक पंचांगानुसार, सूर्य ग्रहाने 15 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजून 28 मिनिटांनी वृषभ राशीत संक्रमण केलं आहे. याच्या काही तास आधी रात्री करिअर आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह संक्रमण करुन वृषभ राशीत आला. त्यामुळे वृषभ राशीत सूर्य-बुध ग्रहाची युती होणार आहे. ही युती 29 मेपर्यंत सक्रिय असणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

बुधादित्य राजयोग वृषभ राशीत जुळून येणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चौफेर लाभ मिळेल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. प्रमोशन मिळण्याची संधी आहे. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

बुधादित्य राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला ठरणार आहे.या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्या कामात तुमची प्रगती दिसून येईल. करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती असेल. तसेच, जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी बुधादित्य राजयोग भाग्याचा ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली भरभराट दिसेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची संधी आहे. तसेच, तुमच्या बॉसकडून तुम्हाला सपोर्ट मिळेल. या काळात अहंकार करु नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                                                    

Shubh Yog 20 May 2026 : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृश्चिकसह 5 राशींना मिळणार शुभ फळ, धनसंपत्तीत भरभराट