Ved Marathi Movie : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'वेड' (Ved) हा मराठी चित्रपट (Marathi Movie) येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटात श्रावणी आणि सत्या यांची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला.   


नवरा जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतो...


वेड चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करतेय. यावेळी जिनिलिया देशमुखला नवरा म्हणजेच रितेश देशमुख जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकत असतो तेव्हा कोणत्या गोष्टी जाणवल्या असा प्रश्न विचारला असता जिनिलिया म्हणाली, वेड हा चित्रपट पूर्णपण रितेशचं स्वप्न आहे. चित्रपटातील एक-एक भूमिकांवर, वेशभूषेवर, अभिनयावर यावर फार मेहनत घेतली आहे. मी फारच भाग्यवान आहे की मला रितेशच्या पहिल्या चित्रपटात त्याची हिरोईन आहे. 


'वेड' चित्रपटाची कथा काय आहे?


प्रेमातल्या वेडेपणाची ही गोष्ट आहे. चित्रपटात दोन प्रेमकथा आहेत. श्रावणी आणि सत्या यांचं तरूणपणातलं अगदी कोवळ्या वयातलं प्रेम आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना तारूण्य, कोवळं प्रेम, ऊर्जा आणि आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडणाऱ्या आहेत. पण, दुसरं प्रेम जे आहे ते समजूतदारपणा, भावना, दु:ख या सगळ्या भावनांचं मिश्रण आहे. 


जिनिलियाला रितेशच्या कोणत्या गोष्टीचं वेड?


जिनिलियाला रितेशच्या कोणत्या गोष्टीचं वेड आहे हा प्रश्न विचारला असता जिनिलिया म्हणाली, रितेश फार क्रिएटिव्ह आहे. तो मला अनेक गोष्टी अनुभवायला शिकवतो. खरंतर मी त्याला माझा गुरु मानते. त्याचबरोबर रितेश हा चांगला मित्र आहे. 


30 डिसेंबरला 'वेड' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 


वेड या चित्रपटात रितेश-जेनिलियासह विद्याधर पाठारे आणि अशोक सराफ यांच्याबरोबरच विद्याधर जोशी आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहे. तर मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार आहे. आता रितेश-जेनिलियाचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Ved Trailer Out : 'वेड' तुझ्यातही आहे आणि माझ्यातही; रितेश-जेनिलियाच्या 'Ved'चा ट्रेलर आऊट