Varsha Usgaonkar Open up about professional Mistakes: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचा चाहतवर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदीसह मराठी सिनेमांमध्ये (Bollywood) आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. केवळ चित्रपट नाही तर नाटकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.  अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, हिंदी सिनेमांमध्ये (Hindi Industry) खूप जास्त चित्रपट करु शकले असते, असं म्हटलं आहे. वर्षा उसगावकर असे का म्हणाले? पाहुयात.

Continues below advertisement

वर्षा उसगावकर यांनी हिंदी सिनेसृष्टीत कमी करण्याबाबत खंत बोलून दाखवली (Varsha Usgaonkar on professional Mistakes)

वर्षा उसगावकर यांनी अलीकडेच एबीपी माझाच्या कट्ट्याला भेट दिली होती. यावेळी, त्यांनी अनेक किस्से शेअर केले. हिंदी सिनेमांचा उल्लेख करताना त्यांनी अनेक चित्रपटांबाबत सांगितलं. वर्षा उसगावकर म्हणाले की, ' हिंदी सिनेमांमधील प्रवास आनंद देणारा निश्चितच होता. त्याच्याबद्दल निराशाजनक असं काही नव्हतं. मागे वळून बघताना मला असं वाटतं, हिंदी सिनेसृष्टीत मी जास्त चित्रपट केले असते, मला करायला पाहिजे होते '. 

' काही व्यावसायिक चुका केल्यामुळे, काही चित्रपट मी करू शकले नाही. याची खंत जरूर आहे ', असं वर्षा उसगावकर म्हणाले. ' गुलशन कुमार यांचा 'लाल दुपट्टा मलमल का' हा सिनेमा होता. रवींद्र पीपट आज आपल्या हयात नाहीत. ते या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. ते राज कपूर यांचे मुख्य असिस्टंट होते '.

Continues below advertisement

' ते स्वतः मला भेटायला आले होते. त्यावेळी माझं 'हमाल दे धमाल' या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. तिथे मला भेटायला आले.  मला म्हणाले की, काश्मिरी मुलीचा रोल आहे. तू मला त्याच्यासाठी योग्य वाटते, असं मला तेव्हा ते म्हणाले होते. माझ्याबद्दल त्यांना कशी माहिती मिळाली, ठाऊक नाही. दीड महिने आम्ही कुलू मनालीला शूटिंग करणार आहोत, असं मला ते म्हणाले होते. हे ऐकून मला फार आनंद झाला. नाही म्हणायचं काहीच कारण नव्हतं. पण त्यावेळी, एका मराठी चित्रपट निर्मात्यांनी मला 3 चित्रपटांसाठी करारबद्ध केलं होत '. असं वर्षा उसगावकर म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Ashok Saraf Dada Kondke: अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'

Salman Khans Maatrubhumi: सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?