Ashok Saraf on Dada Kondke Movie: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Industry) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी त्यांनी गाजवली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिवंगत अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांच्यासोबत काम केलं होतं. अशोक सराफ आणि दादा कोंडके यांची जोडी प्रचंड गाजली होती. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  या प्रसिद्ध जोडीने एकत्रित 3 सिनेमांमध्ये काम केलं होतं. 'पांडू हवालदार', 'तुमचं आमचं जमलं' आणि 'राम राम गंगाराम' या  सिनेमांत अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला.

Continues below advertisement

अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला (Ashok Saraf Reveals Why Dada Kondke Stopped Casting Him in Films)

दादा कोंडके  आणि अशोक सराफ ही जोडी प्रचंड गाजली. अशोक सराफ यांनी अलिकडेच  सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे'ला मुलाखत दिली. त्यांनी या मुलाखतीत अनेक गोष्टी शेअर केल्या. अशोक सराफ म्हणाले की, 'मी त्यांच्यासोबत 3च चित्रपट केले होते. त्यानंतर त्यांचे डबल मिनिंग सिनेमे सुरू झाले.  'राम राम गंगाराम' या सिनेमानंतर त्यांच्या जॉनरमध्ये बदल झाला.  'राम राम गंगाराम' यानंतर त्यांच्यासोबत काम करण्यास नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनीच मला घेतलं नाही. म्हटलं बरं झालं. नाहीतर मला करावं लागलं असतं ना. त्याच्यानंतर मला त्यांनी बऱ्याच वर्षांनी सिनेमासाठी विचारलं होतं. मला त्या सिनेमाचं नावही आठवत नाही'.

'मला त्यांनी विचारलं. मी तिथल्या तिथे स्क्रिप्ट वाचली. त्यांनी मला स्क्रिप्ट दिली नव्हती.  मी बघूया म्हटलं. दादांमध्ये काय बदल झाला, मला ठाऊक नाही. मी हळूच स्क्रिप्ट चोरुन वाचली होती. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कळालं की, हे पात्र आधीही मी साकारली आहे. याला परत करण्यात काय अर्थ आहे? त्यांना सरळ नाही करणार असं म्हटलं', असं अशोक सराफ म्हणाले. सिनेमातील पात्र स्वीकारण्यापूर्वी अशोक सराफ नेमकं कोणते Criteria पाहायचे? या प्रश्नावर उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले की, 'सिनेमा स्वीकारण्यापूर्वी फिल्मची कथा काय आहे? आधी मी कोणते पात्र साकारली आहेत? त्याच्याहून खालचा पात्र मला करुन चालणार नाही. माझं पात्र कुणाबरोबर आहे, हे बघावं लागतं', असं अशोक सराफ म्हणाले. दादा कोंडके यांच्यासोबत सिनेमे साकारल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. अशोक सराफ यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केलं होतं.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Salman Khans Maatrubhumi: सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?