Usha Nadkarni open ups about loneliness: टीव्ही इंडस्ट्रीतील सुपरहिट शो 'पवित्र रिश्ता' (Pavitra rishta) या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. या मालिकेनं भारतभर आपला चाहतावर्ग निर्माण केला होता. वयाच्या 80 व्या वर्षीही अभिनेत्री सिनेसृष्टीत (Entertainment) कार्यरत आहेत. पण खऱ्या आयुष्यात सासूची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांच्या खऱ्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही. पतीपासून विभक्त (Family Struggle), मुलाकडून दुरावा, एकटेपणा आणि वडिलांकडून मारहाण त्यांचं आयुष्य संघर्षाने भरलेले होतं.
उषा नाडकर्णी यांनी आपल्या आयुष्यात बरेच दु:ख सोसले (Usha Nadkarni open ups about loneliness family struggle)
मागील अनेक दशकांपासून उषा नाडकर्णी मुंबईतील फ्लॅटमध्ये एकट्या राहत आहेत. उषा नाडकर्णी यांचं म्हणणं आहे की, त्यांना एकटं राहण्याची सवय झाली आहे. न कोणत्या आधाराशिवाय ते आपलं आयुष्य जगत आहेत. तसेच कामही सांभाळत आहेत. आज तकच्या वृत्तानुसार, उषा नाडकर्णी यांनी आधीच पतीपासून विभक्त राहत असल्याचं सांगितलं. पण त्यांच्या मनात पती किंवा कुटुंबाप्रति कटुता नाही. बऱ्याचदा त्यांनी नाडकर्णी कुटुंबाला आपल्या घरी जेवायला बोलावलं आहे.
उषा नाडकर्णी यांचा एकूलता एक मुलगा विदेशात राहतो. त्यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्या स्वत: शूटिंगमध्ये व्यग्र असल्याकारणाने त्यांच्या आईनेच त्यांच्या मुलाचे संगोपन केले. म्हणून बऱ्याचदा त्यांचा मुलगा उषा नाडकर्णी यांना, 'तुम्ही मला फक्त जन्म दिला आहे. माझी खरी आई तर माझी आजी आहे', असं म्हणतो. अभिनेत्रीने असा खुलासा केला की, 1987 या सालापासून त्या एकट्या राहत होत्या. सुरुवातीला एकटेपणाची सवयी नसल्यामुळे त्यांना भीती वाटत होती.
कुणी हल्ला केला तर? या भीतीपोटी त्या सिक्योरिटी गार्ड्सला घरापर्यंत सोडण्यास सांगत होत्या. पण आता त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. यावेळी उषा यांनी एक चिंता देखील व्यक्त केली. 'जर अचानक रात्री माझा मृत्यू झाला, तर कुणाला कळणार तरी आहे का?' मग स्वत:हून हसून म्हणतात की, 'शेजारचे दार ठोठावतील आणि म्हणतील की, अरे म्हातारीने दार तर उघडलंच नाही...'
उषा नाडकर्णी यांचं बाळपण खूप भयानक होतं. 'माझे वडील खूप रागीट स्वभावाचे होते. लहान लहान गोष्टींसाठी मुलांना मारायचे' एके दिवशी त्यांनी आपल्या भावाला, वडिलांचा मार खाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हाताला दुखापत झाली असली तरी, त्यांनी मंचावर जाऊन नाटक सादर केले. उषा नाडकर्णींच्या आईंना त्यांचे अभिनेत्री होणं मान्य नव्हते. त्यांच्या आईंनी त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले होते. नंतर त्यांचे वडील त्यांना घरी घेऊन आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' फेम जिया शंकरचं ठरलं, साखरपुड्याचे PHOTO Viral, तिचा होणारा नवरा कोण?
