Pradeep Rawat Last Rites: 'सरफरोश' (Sarfarosh), 'लगान' (Lagan) आणि 'गजनी' (Ghajini) यांसारख्या गाजलेल्या हिंदी सिनेमांमधील (Hindi Movie) दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते प्रदीप रावत (Pradeep Rawat) यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी अंत्यविधीला हजेरी लावली. यामध्ये आमीर खान (Aamir Khan), राज अर्जुन, रुहानिका धवन आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश होता. अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडताना त्यांचा मुलगा, विक्रमादित्य रावत, अत्यंत भावूक झालेला दिसून आला. 

Continues below advertisement

एका लेकासाठी बापाचं जाणं म्हणजे, त्याचा आयुष्यभराचा आधार गमावण्यासारखंच. प्रदीप रावत यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर वडील गमावण्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं. कितीतरी वेळ धीर धरुन उभ्या असलेल्या विक्रमादित्यच्या भावनांचा बांध अखेर फुटला. ज्यांनी जन्म दिला, ज्यांचं बोट धरुन जग पाहिलं आज त्यांना अखेरचा निरोप देणं विक्रमादित्यसाठी काळीज पिळवटणारं होतं. वडिलांवर अंत्यसंस्कार करताना त्याला रडू आवरणं कठीण झालं आणि तो हमसून हमसून रडताना दिसला. 

मुंबईतील गोरेगाव येथील 'बेस्ट' (BEST) कॉलनीजवळ बुधवारी हा अंत्यविधी पार पडला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमिर खानपासून ते रझा मुराद यांच्यापर्यंत अनेक कलाकार उपस्थित होते. नव्वदच्या दशकातील दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका 'चंद्रकांता'मध्ये 'क्रूर सिंह' (यक्कू) ही भूमिका साकारून प्रसिद्धीस आलेले अखिलेंद्र मिश्रा हेदेखील त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. आपल्या वडिलांना निरोप देताना त्यांचा मुलगा भावूक झाला होता आणि तो अत्यंत दुःखी दिसत होता. जड अंतःकरणानं विक्रमादित्य अंत्यविधीची तयारी करताना दिसून आला.

Continues below advertisement

दोन महिन्यांपूर्वीच पप्पांचं चेकअप केलेलं, त्यात काहीच आलं नाही : विक्रमादित्य रावत

मीडियाशी बोलताना, प्रदिप रावत यांचा मुलगा विक्रमादित्य रावत यानं वडिलांच्या आजारपणाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, "आम्हाला वाटलं की, हे कदाचित पोटाचं इन्फेक्शन असू शकतं, त्यामुळे त्यावर बरीच औषधे दिली गेली... एक दिवस तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, रक्त तपासणीत पांढऱ्या रक्तपेशींची (WBC) संख्या खूप जास्त असल्याचं दिसून आलं. त्यांना लगेचच कोकिलाबेन रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथेच आम्हाला समजलं की, त्यांना 'ब्लड कॅन्सर' असण्याची 99% शक्यता आहे, अर्थात आम्हाला तसं नसावं अशी आशा होती, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना 'ल्यूकेमिया' असल्याचं निदान झालं. मला आणि आईला मोठा धक्का बसला. हा रक्ताच्या कर्करोगाचा अत्यंत दुर्मिळ आणि वेगानं पसरणारा प्रकार असल्याचं आम्हाला समजलं. आम्ही दोन महिन्यांपूर्वीच त्यांची तपासणी केली होती आणि त्यात काहीही आढळलं नव्हतं, त्यानंतर अवघ्या अर्ध्या महिन्यातच कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला. ही सर्व घटना साधारण दीड महिन्यापूर्वीची आहे..."

कॅन्सर पुन्हा परतला... 

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, प्रदीप रावत यांचे मॅनेजर सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले की, अभिनेत्याला झालेला कर्करोग पुन्हा बळावला होता आणि गेल्या एका महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास