Usha Nadkarni : अभिनेता सुशांत सिंगची आत्महत्या नाही, त्याला मारलं गेलंय, असा दावा मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी केलाय. त्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या स्वभावाबाबत वर्णन देखील केलंय. उषा नाडकर्णी Usha Nadkarni) यांनी कोणते दावे केलेत जाऊन घेऊयात...
खरंच गोड पोरगा होता, या सगळ्या लोकांनी त्याची वाट लावली : उषा नाडकर्णी
उषा नाडकर्णी म्हणाल्या, जेव्हा माझी सुशांत सिंग राजपूतशी पहिली ओळख झाली तेव्हा पाहिलं होतं. छान पोरगा होता. बोलायला वगैरे खूप छान होता. नंतर थोडा त्याला साथी वेगळ्या मिळाल्यामुळे तू थोडा वेगळा झाला. वेगळा म्हणजे नेहमीतल्या वागण्यापेक्षा वेगळा झाला. तो पोरगा होता गोड... खरंच गोड पोरगा होता. या सगळ्या लोकांनी त्याची वाट लावली. मी नेहमी सांगते त्याने हँग करुन घेतलेलं नाही. मी फेसबुकवर व्हिडीओ पाहिला. त्यामुळे त्याला मारण्यासाठी जे वापरलं ते सगळं आहे. 'ज'वरुन काहीतरी त्या मुलीचं नाव आहे. मी कायम खरी एकटी असल्यामुळे बोलायला कोण नाही. मी फेसबुक पाहात असते. मला वाटतं माझे डोळे जातील फेसबुकमुळे...त्या व्हिडीओमध्ये सगळं होतं. अगदी त्याच्या गळ्याला आवळलेला बेल्ट देखील होता. त्यामुळे मी नेहमी सांगते त्याने हँग करुन घेतलं नाही, त्याला मारलंय. मी सांगते की, देव आहे. सुशांतने ज्याला मारलंय देव त्यांना शिक्षा देईल. मला पाहिजे तर गोळ्या घालू दे किंवा काही करुदे..
पुढे बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, मला पहिल्यापासून एकटं राहायला येतं. मी बिग बॉसमध्ये पोरांच्यात जाऊन बसत नव्हते. मुली सगळ्या छोट्या छोट्या होत्या. मी त्यांच्यासोबत काय गप्पा मारणार? सुरुवातीला तर मी पवित्र रिश्ता ही मालिका सोडून येणार नाही, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी सांगितलं की, मराठी आहे. मग मी म्हटलं मराठी आहे, आपलेच लोक आहेत. मग मी गेले. बिग बॉसमधील लोक आम्ही किती मोठे शहाणे आणि आम्ही लोकांना कसं बोलतो. आम्ही कसे दीड शहाणे... मी म्हटलं तुम्ही मरा ...मी काही बोलायचेच नाही. त्यामुळे एकटीच बसायचे. घरी कोण बोलायला कोण नाही म्हणून मी फेसबुक बघते.
इतर महत्त्वाच्या बातम्या