Usha Mangeshkar on Asha Bhosle: भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले, आणि संगीत क्षेत्र तसेच सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. अलिकडेच  'देशोदेशी पानोपानी आशा आशा' हे ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या कारकि‍र्दीवर आधारीत स्वरप्रतिभा या विशेषांकाचे प्रकाशन उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेषांकाचे संपादन प्रवीण वाळिंबे यांनी केले आहे. या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार,  महापालिकेतील काँग्रेसचे  गटनेते रामचंद्र कदम, कामगार नेते सुनील शिंदे आणि ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. यावेळी उषा मंगेशकर यांनी आशा भोसले यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

Continues below advertisement

उषा मंगेशकर यांनी  आशा भोसलेंच्या छायाचित्रावर हार घालण्यामागचं कारण सांगितलं (Usha Mangeshkar on Asha Bhosle)

आशा भोसले यांच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकरांनी आशा भोसले यांच्या कारकि‍र्दीवर प्रकाश टाकला, म्हणाल्या की, 'आशा ताईंनी आपल्या कारकिर्दीत अनेक संकटांना धैर्याने सामना केला आहे. लता दीदींनी आपल्या कारकि‍र्दीत 35 भाषांमध्ये गाणी गायली.  तर, आशा ताईंनी आपल्या गायनातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलंय.  आशा ताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाला मोठा धक्का बसला', असं उषा मंगेशकर म्हणाल्या.

'खरंतर आशा ताई आज आपल्यात नाही. परंतु, त्या आपल्या गीतातून अमर झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही आशा ताईंच्या  छायाचित्राला कधीही हार घालत नाही', असं उषा मंगेशकर म्हणाल्या. यावेळी उषा मंगेकशर यांनी आशा भोसले यांनी गायलेलं आवडत्या गाण्याबद्दलही सांगितलं. 'आशा ताईंची गाणी आजही आवडीने ऐकली जातात. पण मला स्वत:ला तिचं   'पांडुरंग कांती' हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड आवडतं',   असं उषा मंगेशकर म्हणाल्या.

Continues below advertisement

आशा भोसले यांची मनाला चटका लावणारी एक्झिट

भारतीय संगीत विश्वात आशा भोसले यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांच्या गाण्यांचा  आणि स्वरांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.   त्यांनी अकाली एक्झिट घेतल्यामुळे आशा भोसलेंच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.  12 एप्रिल 2026 रोजी त्यांनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत त्यांचं निधन झालं.  त्यांच्या निधनानंतर संगीत विश्व आणि मंगेशकर कुटुंबावर  दु:खाचा डोंगर कोसळला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

थलपती विजयच्या 'जन नायगन'चा जलवा; 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धडाका, सोमवारीही कोटींच्या घरात कमाई