Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी चाळीसगाव (Chalisgaon) येथे केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या विकासकामांचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांनी एक प्रकारे आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Continues below advertisement

चाळीसगाव शहरात विविध शासकीय कार्यालयांचे उद्घाटन तसेच विकासकामांचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात दोन्ही मंत्र्यांनी आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.

Girish Mahajan: मंगेश चव्हाणांचा अभिमान वाटतो

यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने (BJP) मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली, तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकासकामांचा धडाका लावला, ते पाहून आम्हालाही त्यांचा हेवा वाटतो, असे त्यांनी नमूद केले.

Continues below advertisement

Girish Mahajan: गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत?

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, "आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार आहे. त्यावेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावं वाटतं," असे म्हणत त्यांनी एक प्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Gulabrao Patil: काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "कामाची भूक असलेला नेता म्हणजे आमदार मंगेश चव्हाण आहे. मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावचा विकास करताना गिरीश महाजन यांच्या मार्गाने विकास केला आहे, हे इतर आमदारांनाही सांगावे लागेल. चाळीसगाव हे महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यापासून दूर असल्याने या ठिकाणी विकासकामे होणे महत्त्वाचे आहे आणि इथे मात्र त्यांनी मोठे काम करून दाखवले आहे.

शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मोठा निधी मिळाला आहे. प्रत्येक आमदाराला एक हजार कोटी रुपये मिळाले असतील, रस्त्यांचे डांबरीकरण होत आहे. मी पालकमंत्री झाल्यापासून धरणे भरत आहेत. तुम्ही धरणे बांधा, मी पाणी जिरवतो. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून गिरीश महाजन यांनी मोठे काम दिले आहे, त्याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत.

मी गेली सात तास या कार्यक्रमात आहे, पण हे काम पाहून माझा थकवा निघून गेला. काम करणाऱ्या माणसाला मरण नसते, लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. लोकांच्या सुख-दुःखात आम्ही नेहमी सहभागी होत असतो. जिल्ह्याच्या विकासासाठी समजदारी दाखवली पाहिजे. गिरीश महाजन यांना चिमटा काढल्याशिवाय माझे पोट भरत नाही, कारण आमचे घट्ट मैत्रीचे नाते आहे. मंगेश चव्हाण यांच्या पाठीशी मोठे हात आहेत आणि सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत, ज्याचा आम्हाला अभिमान आहे. चाळीसगावच्या शालीमुळे उब मिळाली. दोन्ही आमदारांमध्ये वाद होऊ नये यासाठी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करावी," असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?