Actor Ajith Kumar Stranded In Dubai: अमेरिका-इराण संघर्षाचा (US Iran Conflict) परिणाम दुबईवरही (Dubai) झाला आहे. यामुळे दुबई विमानतळावरुन उड्डाण घेणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत,  ज्यामुळे अनेकजण अडकून पडले आहेत. सोनल चौहान, ईशा गुप्ता आणि विष्णू मंचू यांच्यासह अनेक भारतीय सिनेकलाकार दुबईत अडकले आहेत. अमेरिका-इराण तणावादरम्यान साऊथ सुपरस्टार अजित कुमारही दुबईत अडकला आहे. लाडका अभिनेता अजित कुमार दुबईत अडकल्याचं ऐकताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अशातच आता अभिनेत्याच्या मॅनेजरनं याबाबत माहिती दिली आहे. अजित कुमार चेन्नईला परतणार होता, पण अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबई विमानतळावरुन संपूर्ण जगभरात जाणारी सर्वच्या सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आणि अभिनेत्याला दुबईतच थांबावं लागलं. आता अभिनेत्याच्या मॅनेजरनं साऊथ सुपरस्टारच्या सुरक्षेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Continues below advertisement

ट्रेनिंगसाठी दुबईला गेलेला अजित कुमार

अजित कुमार सध्या अबू धाबीमध्ये त्याच्या पुढच्या कार रेसची तयारी करत होता. सर्वांनाच माहीत आहे की, अजित कुमारला रेसिंगची खूप आवड आहे आणि तो फक्त एक छंद नाही तर, एक व्यवसाय म्हणूनही रेसिंग करतो. त्यानं अलीकडेच 2025 मध्ये प्रसिद्ध 24H दुबई रेसमध्ये भाग घेतला आणि चांगली कामगिरी केलेली. आता पुन्हा याच रेसमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेता दुबई आणि अबू धाबीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेला. दरम्यान, या प्रदेशात तणाव वाढल्यानं हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आणि अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली. तो सध्या दुबईतीलच एका हॉटेलमध्ये आहे आणि सुरक्षित आहे, असं मॅनेजरनं सांगितलंय.  

अजित व्यतिरिक्त, इतर सेलिब्रिटी देखील दुबईमध्ये अडकलेत

अभिनेत्री सोनल चौहान देखील दुबईमध्ये अडकली आहे आणि तिनं पंतप्रधानांना मदतीसाठी आवाहन केलं आहे.तसेच, तिनं सांगितलंय की, ती ठीक आहे आणि लवकरच घरी परतण्याची आशा करतेय. अभिनेत्री सोनल चौहाननं देखील सोशल मीडियावर शेअर केलंय की, ती दुबईमध्ये आहे आणि भारतात परतण्यासाठी कोणताही मार्ग तिला सापडलेला नाही. दरम्यान, डबल ओलंपिक मेडलिस्ट पीव्ही सिंधू देखील दुबई विमानतळावर अडकली आहे.

Continues below advertisement

दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे सध्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. संयुक्त अरब अमिराती, इस्रायल आणि इराकसह अनेक देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या हवाई क्षेत्राचे काही भाग हवाई वाहतुकीसाठी बंद केले आहेत. यामुळे दुबई आणि अबू धाबी सारख्या प्रमुख विमानतळांवरील उड्डाणसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हजारो प्रवासी अडकले आहेत. दरम्यान, परिस्थिती सामान्य होताच, सेवा पुन्हा सुरू होतील, असं दुबई विमानतळावरील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

इराण इस्रायल अमेरिकेच्या तणावात अडकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, दुबईतून थेट PM मोदींना मदतीसाठी हाक