Horoscope Today 2 March 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 2 मार्च 2026 चा दिवस आहे. आजचा वार सोमवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. महादेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
प्रकृतीबाबत औषध उपचार घेताना अनेक प्रकारची औषधे घेतल्यामुळे गुण लवकर येणार नाही.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आपल्या आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास चांगला करण्यामध्ये तुम्ही वाकबगार राहाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
कोणताही आर्थिक निर्णय आज घेऊ नका तो फायदेशीर ठरणार नाही.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
जोडीदाराची तात्विक मतभेद होण्याची शक्यता नोकरीमध्ये काहीही काम केले तरी वरिष्ठांची मर्जी संपादन होणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कष्टाची परिसीमा गाठलीत तरी आपला पराक्रम सिद्ध करण्यासाठी बऱ्याच लोकांच्या संपर्कात यावे लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
तुमची कला लोकांच्या समोर येण्यासाठी बरेच तर्क-वितर्क करावी लागतील इस्टेटचे वाद थोडे चिघळतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
भाग्याची साथ थोडी कमी पडल्यामुळे इतरांसमोर जरा नमतेच घ्यावे लागेल म्हणून आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आपला पराक्रम सिद्ध करणे ही जादू नाही ती एक साधन आहे हे लक्षात ठेवले तर बरेच काही साधून जाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
अचानक प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या संधी चालून येतील परंतु आरोग्याच्या तक्रारी राहतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा राहील त म्हणले की ताकभात हे तुम्हाला लगेच समजेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येण्याचा संभव आहे महिला आपल्या बुद्धीच्या जोरावर पुढे जातील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
संथवृत्ति आणि भित्रेपणा यामुळे असुरक्षिततेची भावना तुम्हाला बेचैन करेल त्यामुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
