Urfi Javed Viral Scary Video: उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशन आणि बोल्ड स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते, पण यावेळी उर्फीचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. उर्फीच्या चेहऱ्यावर खूपच सूज आहे. तसेच, तिचा चेहरा रक्तानं माखलेला आहे. उर्फीला नेमकं झालंय काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हा कोणत्याही ब्युटी ट्रिटमेंटचा परिणाम तर नाही ना? असाही प्रश्न चाहते विचारत आहेत. खरं तर उर्फीला कोणत्याही ब्युटी ट्रिटमेंटमुळे साईड इफेक्ट झालेले नाहीत. तर, उर्फीच्या लाडक्या पाळलेल्या मांजरीनंच तिच्यावर हल्ला केला आहे.
उर्फीसोबत नेमकं काय झालं?
उर्फी जावेदनं नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही स्टोरीज शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरच्या जखमा आणि रक्तानं माखलेला चेहरा स्पष्ट दिसत आहे. विशेषतः डोळ्याखाली खोल ओरखडे आणि सूज दिसून येत आहे. यासोबत उर्फीनं एक कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "कॅट पॅरेंट्स, तुम्हाला कळेल का? मी सोफ्यावर बसले होते आणि अचानक माझ्या मांजरीनं मला (चुकून) ओरबाडलं..." म्हणजेच, उर्फीला झालेली दुखापत तिच्या मांजरीच्या नखांमुळे झाली होती, जी कदाचित खेळताना थोडी जास्तच लाडात आली आणि तिनं उर्फीला ओरबाडून काढलं.
व्हिडीओत दिसली, गंभीर परिस्थिती
उर्फी जावेदनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं कॅमेऱ्यासमोर आपल्या डोळ्यांखाली झालेली जखमी जवळून दाखवली. व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर मांजरीच्या पंज्याचा निशाण आणि सूज स्पष्ट दिसतेय. दरम्यान, उर्फी हे सगळंकाही गमतीनं सांगत होती. तसेच, एवढी दुखापत होऊनही ती हसत होती. पण, चाहत्यांना त्यांच्या जखमा पाहून चिंता लागून राहिली आहे.
सर्वात गमतीशीर बाब म्हणजे, उर्फीनं आपल्या मांजरीच्या केअरटेकरचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती केअरटेकर मांजरीला ओरडत होती. तिनं म्हटलं की, 'उर्फीला पंजा का मारला...?', तर उर्फी मागून हसत हसत व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. उर्फीनं या व्हिडीओसोबत एक कॅप्शनही लिहिलं आहे. उर्फी म्हणाली की, 'ही मांजर नाही, राक्षस आहे...'
चाहत्यांची काळजी आणि प्रेम
उर्फीच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया भरपूर होत्या. एका युजरनं लिहिलेलं की, "जखम खोल दिसतेय, काळजी घे उर्फी...", तर दुसऱ्या युजरनं लिहिलेलं की, "मांजरी कधीकधी खूप खोडकर होतात..." तसेच, अनेकांनी उर्फीच्या धाडसाचं आणि विनोदी शैलीचं कौतुकही केलं.
दरम्यान, उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते आणि तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्समुळे कधीकधी टीकेची धनीही होते. यावेळी ड्रेस नाही तर, उर्फीच्या गोंडस मांजरीनं तिला पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :