Kangana Ranaut Talk On Entering Temple In Periods: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि भाजप खासदार (BJP MP) कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या एका व्हायरल व्हिडीओवर केलेल्या कमेंटमुळे चर्चेत आलेल्या. सध्या त्या त्यांच्या एका लेटेस्ट इंटरव्यूमुळे चर्चेत आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबाबत अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. तसेच, यावेळी त्यांनी मासिक पाळी (Menstruation) दरम्यानची स्वच्छता आणि त्यावेळी महिलांनी मंदिरात प्रवेश न करणं, यासारख्या मुद्द्यांवरही चर्चा केली. कंगना रनौत यांनी मासिक पाळीच्या विषयावर आपलं रोखठोक मत मांडलं. तसेच, आपल्या बालपणीच्या काही आठवणीही शेअर केल्या. त्या लहान असताना या गोष्टी कशा समजावून सांगितल्या जायच्या यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. 

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कंगना रनौत म्हणाल्या की, "मासिक पाळीबद्दलचं शिक्षण नववीच्या वर्गात शिकवलं जातं... मात्र तोपर्यंत अनेक मुलींना पाळी आलेली असते. आपण जे पुस्तकात वाचतो ते अतिशय वरवरचं असतं. बहुतेकदा घरीच आपल्याला त्याबद्दलचं शिक्षण मिळतं... माझी मासिक पाळी येत नव्हती आणि मी बाहुल्यांसोबतच खेळत होते... तेव्हा आई चिंतेत होती. मग एके दिवशी जेव्हा मी उठले, तेव्हा बेडशीटवर आणि सगळीकडे रक्त होतं, जे खूपच भयानक होतं... मला विश्वासच बसत नव्हता की, आता दर महिन्याला असं होईल, पण शेवटी मला मासिक पाळी आली आणि त्यावेळी माझी आई खूप आनंदी होती..."

"त्या दिवसात, मला मी स्वतः खूप घाणेरडी वाटायची..."

मुलाखतीत कंगना यांना मासिक पाळीबाबत प्रश्न विचारण्यात आले. मासिक पाळीदरम्यान मंदिरात जाऊ शकत नाही, स्वयंपाकघरात जाण्यावरही काही मर्यादा आहेत. तुमच्या घरी अशी प्रथा होती का? यावर बोलताना कंगना रनौत म्हणाल्या की, "हो, त्यावेळी ते चांगलं होतं. मी कधीही मंदिरात जाण्यासाठी संघर्ष केला नाही, कारण त्या दिवसांत माझी मलाच घाण वाटायची... मला सर्वांना मारावं वाटायचं आणि मला तिथे जाण्याचीही इच्छा नव्हती. त्यावेळी आई आमच्याबद्दल खूप संवेदनशील असायची"

"लोक मंदिरात किंवा स्वयंपाकघरात जाण्यासाठीही विरोध करतात. मला वाटतं जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल तर तुम्ही जावं. मी माझ्या घरात एकटी राहते, म्हणून मला जावंच लागेल, म्हणून ज्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, त्यांना स्वयंपाकघरात जावंच लागतं. जेव्हा एखादी महिला दुःखाच्या स्थितीत असते, तेव्हा त्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. म्हणूनच अनेक महिला देवासमोर जाण्याची इच्छा बाळगत नाहीत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कोणासाठी जेवण बनवलं नाही. तर ते त्यांच्या कल्याणासाठी आहे... खरं तर, विश्रांती घेण्याची हीच वेळ आहे...", असं कंगना रनौत म्हणाल्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pratik Gandhi On Failure Of Phule Movie: 'फुले' सिनेमाच्या अपयशावर पहिल्यांदाच बोलला प्रतीक गांधी, म्हणाला...