Urfi Javed Dressing Style : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. अनेकदा तिच्यावर टीकाही होती. तर काही लोक उर्फीचे तोंडभरुनही कौतुकही करतात. दरम्यान, बॉलिवूडमध्ये (Bollywood) अंतरंगी ड्रेसिंग स्टाईल असलेली उर्फी जावेद एकटीच नाही. उर्फीप्रमाणे बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. ज्या अशाच पद्धतीने ड्रेसिंग (Dressing Style) करतात. या यादीत अनन्या पांडे आणि मलायका अरोरासह आणखी काही अभिनेत्रींचा समावेश आहे. जाणून घेऊयात अभिनेत्रींबद्दल ज्या त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे लोकांना हैराण करुन सोडतात. 


1. साक्षी चोप्रा 


अभिनेत्री साक्षी चोप्रा अनेका बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. शिवाय तिने अनेकदा विचित्र प्रकारचे ड्रेस परिधान केलेले असतात. याच्यामुळे तिची तुलना उर्फी जावेद हिच्याशी केली जाते. 






2. मलायका अरोरा 


अरबाज खानची विभक्त पत्नी सध्या अर्जुन कपूरला डेट करताना दिसत आहे. मलायकाही तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. तिचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मलायकाचा बोल्ड अंदाज आणि अनोखी ड्रेसिंग स्टाईल यामुळे चाहते नेहमीच घायाळ होताना दिसले आहेत. 


3. जान्हवी कपूर 


श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. अतरंगी ड्रेसमुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. या ट्रोलिंग दरम्यान तिची तुलना उर्फी जावेदशी केली जाऊ लागली होती. 






4. शर्लीन चोप्रा 


अभिनेत्री शर्लीन चोप्रा अनेकदा अतरंगी ड्रेसमध्ये स्पॉट झाली आहे. तिची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसले आहेत. दरम्यान, तिचे ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना देखील उर्फी जावेदशी सुरु केली होती. 






5. अनन्या पांडे


अभिनेत्री अनन्या पांडेने विदेशात एका कल्चरल प्रोग्राममध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये तिने उर्फी जावेदला मागे टाकत फुलपाखराच्या डिझाईनचा ड्रेस बनवला होता. त्यामुळे अनन्याने उर्फी जावेदला तगडं आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Bollywood romantic proposals : बॉलिवूडमधील 10 सर्वांत रोमँटिक प्रपोज; आलीया भट्टसाठी रणबीरने मर्यादा सोडल्या!