Upcoming Movies and Series On OTT This Week  : ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजला तसेच चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. वेगवेगळ्या विषयांवर अधारीत असलेल्या वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतात. पाहूयात या विकेंडला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.


Human : 14 जानेवारी रोजी ह्यूमन ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही एक क्राईम ड्रामा सीरिज असणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री  कीर्ति कुल्हारी  आणि  शेफाली शाह या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन विपुल शाहा आणि मोजेज सिंह यांनी केले आहे. 


YEH KAALI KAALI ANKHEIN : या वेब सीरिजमध्ये ताहिरा राज आणि श्वेता त्रिपाठी प्रमुख भूमिका साकरणार आहेत. ही एक सायकोलॉजी थ्रिलर वेब सीरिज असणार आहे, 14 जानेवारीला ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या टिझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आंचल सिंह, सौरभ शुक्ला, बृजेंद्र काला  आणि अरुणोदय सिंह यांनी या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. 


Ranjish Hi Sahi : पुष्पराज भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेली  'रंजिश ही सही' ही सीरिज आज (गुरूवार) प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये ताहिर राज भसीन (शंकर), अमृता पुरी (अंजू)  आणि अमाला पॉल (आमना) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 
 
Pushpa : सध्या सगळीकडे पुष्पा द राइज या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता पुष्पा हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


संबंधित बातम्या


Underwater Painting of Pushpa :  अल्लू अर्जुनचा 'जबरा फॅन'; साकारले पुष्पा चित्रपटातील लूकचे अंडर वॉटर पेंटिंग


Allu Arjun : प्रायव्हेट जेट,लग्झरी गाड्या अन् आलिशान घर ; अल्लू अर्जुनची डोळे विस्फारणारी संपत्ती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha