Lawrence Bishnoi Threat:  बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा सध्या बिश्नोई गँगच्या रडावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागेही बिश्नोई गँगचा हात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर बिश्नोई गँगकडून सलमानलाही जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याच्या बातम्या समोर येतात. पण आता लॉरेन्स बिश्नोईलाच (Lawrence Bishnoi) धमकी आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 


लॉरेन्स बिश्नोईला रायबरेली येथील एका मजुराने धमकी दिल्याचं सांगण्यात येत आहे. या तरुणाने सोशल मिडिया एक फेसबुक पोस्ट करत लॉरेन्स बिश्नोईला आव्हान दिलंय. लालगंज कोतवाली परिसरातील दीपमाऊ सोहवाल गावात राहणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्हिडीओमध्ये नेमकं काय?


व्हायरल व्हिडीओमध्ये हा तरुण लॉरेन्स बिश्नोईला धमकावताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, ऐक लॉरेन्स बिश्नोई, मुंबईत तुझे दोन हजार शुटर्स तयार आहेत तर मीपण माझे पाच हजार शुटर्स मुंबईला पाठवले आहेत. आता तुझी खैर नाही आणि तुझ्या शुटर्सचीही खैर नाही. एकही जण सुटणार नाही. सलमान भाईजानला काही झाले तर तुझं काही खरं नाही.  या व्हिडिओमध्ये तो लॉरेन्स बिश्नोईला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनीही कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं.                       


पोलिसांनी काय म्हटलं?


या प्रकरणाबाबत लालगंज सीओ अनिल कुमार सिंह यांनी म्हटलं की, या मुलाचं नाव इमरान असून तो लखनौमध्ये मजूर आहे. तो लखनौसह इतर शहरांमध्ये रंगकाम करतो. या तरुणाला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने दारूच्या नशेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं त्याने कबुल केलं आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे सगळं बोलल्याचं त्याचं म्हणणं आहे. तसेच भविष्यात असं काहीही करायचं नाही, असा दम देऊन पोलिसांना त्याला सध्या सोडून दिलं आहे.                                                       


ही बातमी वाचा : 


Jui Gadkari : जुई गडकरीने साजरी केली कायम स्मरणात राहणारी दिवाळी, निराधार आजी-आजोबांसोबत केलं खास सेलिब्रेश