Yogi Adityanath Reaction On Disha Patani House Firing: उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेबाबत (Women's Safety) एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिशा पाटनी (Actress Disha Patani) हिच्या बरेली येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा (Shooting Outside Home) संदर्भ देत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं. गुन्हेगारांना आता उत्तर प्रदेशात स्थान मिळणार नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. शनिवारी लखनौ येथील लोकभवन येथे झालेल्या एका समारंभात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलंय.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या घरी झालेल्या गोळीबाराची घटना देशभरात चर्चेत आली होती. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना चकमकीत ठार मारलं. तर दोघांना अटक केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी गोळीबाराच्या घटनेत अटक केलेल्या एका हल्लेखोराची तुलना मारीच राक्षसाशी केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, "गुन्हेगारांना आता उत्तर प्रदेशात स्थान मिळणार नाही. एक गुन्हेगार मारीचच्या वेशात आला होता, पण पोलिसांच्या गोळीनं जखमी झाल्यावर तो ओरडला, उत्तर प्रदेशात येणे ही चूक होती... कायदा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराचे नशीब असेच असेल..."
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, "काल तुम्ही पाहिलं की, महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला एक गुन्हेगार राज्याबाहेरून आला होता. तो कदाचित मारिच (वेशभूषा बदलून आलेला राक्षस) बनूनच घुसला असेल, पण जेव्हा त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी गोळी मारली, तेव्हा तो ओरडत होता की, तो चुकून उत्तर प्रदेशात आला आणि पुन्हा कधीही असं करण्याचं धाडस करणार नाही... महिलांच्या सुरक्षेला हानी पोहोचवणाऱ्या, त्यांच्या प्रतिष्ठेला आणि स्वावलंबनाला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला आमचे पोलीस सोडणार नाहीत... त्यांचा खात्मा होईल किंवा त्यांना हे राज्य सोडून जावंच लागेल..."
दिशा पाटनीच्या घरावर गोळ्या झाडणारे दोन ठार, दोघे ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील वडिलोपार्जित घरावर गोळीबार करणाऱ्या पाच आरोपींपैकी एक असलेल्या रामनिवासला गेल्या शुक्रवारी झालेल्या चकमकीनंतर त्याचा साथीदार अनिलसह अटक करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक बरेलीमध्ये झाली, ज्यामध्ये आरोपी रामनिवासच्या पायाला गोळी लागली. घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये रामनिवास हात जोडून जमिनीवर पडलेला दिसला आणि पोलिसांना म्हणाताना दिसला की, मी कधीही पुन्हा उत्तर प्रदेशात येणार नाही. माझी चूक झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :