Uorfi Javed Enters Bigg Boss OTT 2: अभिनेत्री उर्फी जावेदला (Uorfi Javed) बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. आता उर्फीला बिग बॉस OTT 2 च्या घरात एन्ट्री मिळाली आहे. उर्फी जावेदने सोमवारी बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात प्रवेश केला.


यावेळी तिने स्क्रूपासून बनलेला क्रॉप टॉप आणि स्कर्ट घातला होता. उर्फीने तिच्या या ड्रेसला Screw You असं नाव दिलं आहे. तिचा हा लूक सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर उर्फीच्या या लूकचे फोटो व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने असंही सांगितलं की, ती मनीषा राणी आणि अभिषेक मल्हानला सपोर्ट करत आहे. यासोबत ती एल्विश यादवला चीअर करत आहे. आणि जेव्हा पापाराझींनी पूजा भट्टचं नाव घेतले तेव्हा उर्फीने पूजा गोड असल्याचं म्हटलं. 






पूजा भट्ट उर्फीला म्हणाली लिजेंड


घरात शिरताच उर्फीने बेबिकाला मिठी मारली. उर्फीच्या एंट्रीने बेबिका खूपच खूश दिसत होती. त्याचवेळी पूजा भट्टने उर्फीला लिजेंड म्हटलं. पूजा भट्टने उर्फीला मिठी मारली, तिचं चुंबन घेतलं आणि आय लव्ह यू म्हणाली. ज्यानंतर उर्फीने पूजाला म्हटलं की, तू अप्रतिम आहेस.


बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये होती उर्फी


उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमधला तिचा प्रवास फक्त आठवडाभराचा होता. मात्र, शो सोडल्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली. तिच्या फॅशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फी जावेद तिच्या वेगळ्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित करते. मात्र, काहीवेळा ती या कारणामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येते. उर्फीने अनेक लोकप्रिय शोमध्ये छोट्या भूमिका देखील केल्या आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है या शोमध्ये ती दिसली आहे.


उर्फी जावेदचं बॉलिवूडमध्ये पदार्पण?


आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद लवकरच बॉलिवूड सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे. एकता कपूरच्या आगामी सिनेमासाठी उर्फीला विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. 


ईटाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, एकता कपूरच्या आगामी 'लव्ह सेक्स और धोका 2' (Love Sex Aur Dhokha 2) या सिनेमासाठी उर्फीला विचारणा झाली आहे. या सिनेमात उर्फी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून उर्फी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. 


उर्फी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण अद्याप 'लव्ह सेक्स और धोखा 2'च्या निर्मात्यांनी किंवा उर्फीने अधिकृतरित्या याबद्दल भाष्य केलंलं नाही. लवकरच ती चाहत्यांना यासंदर्भात माहिती देईल, असं म्हटलं जात आहे.


हेही वाचा:


Gauri Sawant: आधी घरातून हकललं, मग वडिलांनी केले अंत्यसंस्कार... आयुष्यातील ही घाव सोसून गौरी सावंतने निर्माण केली आपली ओळख