TV Actor Anuj Sachdeva Attacked in Mumbai: टिव्ही अभिनेता आणि मॉडेल अनुज सचदेवावर (Anuj Sachdev)  प्राणघातक हल्ला झाला होता. 15 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्याच्यावर कोणतरी काठीने वार केले होते.  मार इतका जबर होता की, त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते. यानंतर या कलाकाराने एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला होता. या व्हिडिओत त्याने या घटनेची माहिती शेअर केली होती.  त्याने त्याच्यावर हल्ला कसा झाला, याची माहिती दिली. त्याने या नंतर एक व्हिडिओ  नुकताच पोस्ट करून आपल्या प्रकृतीबाबत अपडेट  शेअर केली आहे. अनुजने या व्हिडिओतून आरोप केला की,  या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेपासून तो मानसिक आघाताने ग्रस्त आहे, अशी माहिती त्याने पोस्टद्वारे दिली.    यावर नेटकऱ्यांनी कमेंट करून अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली.

Continues below advertisement

मुंबईला एक असुरक्षित शहर म्हणून संबोधताना अनुजने लिहिले की, "हल्ल्याच्या त्या रात्रीनंतर झालेल्या दुखापतींचा परिणाम अजूनही माझ्या मनावर आहे. मला रोज रात्री या गोष्टीवरून मानसिक  त्रास होतो. मुंबई किती असुरक्षित झाली आहे.  याचा विचार करत असतो. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहे.  कायदा आणि सुव्यवस्थेच्या कार्यपद्धतीमुळे मला प्रचंड निराशा वाटते.  हे आपल्या  व्यवस्थेचे  मोठे अपयश आहे",  असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आणि जखमा पाहून चाहते व्यथित झाले आहेत. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंटद्वारे अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे.  एका चाहत्याने लिहिले की, 'तू खूप धाडसी आहे. या प्रकरणात जो कुणी आरोपी असेल त्याला लवकर शिक्षा होईल. तू लवकरच  या वेदनादायक अनुभवातून  सावरशील, अशी मनापासून आशा आहे'स अशी कमेंट केली आहे.  यापूर्वी अनुज सचदेवाने  या घटनेचा व्हिडिओ  सोशल मीडियात शेअर केला होता. त्यानं व्हिडिओत सांगितलं की, गृहनिर्माण सोसायटीमध्ये चुकीच्या पार्किंगचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वादाला सुरूवात झाली होती.  अनुजच्या सांगितले की, आरोपीने त्याच्यावर आणि त्याच्या कुत्र्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

अनुजने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, भविष्यात त्याला किंवा त्याच्या मालमत्तेला कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी तो हे पुरावे सोशल करत आहे.  अनुजने ही घटना गोरेगाव पश्चिम येथील हार्मनी मॉल रेसिडेन्सीसच्या सोसायटी पार्किंगमध्ये घडल्याचे सांगितले असून, चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या कारवरून हा वाद निर्माण झाला, असेही त्याने पोस्टमध्ये नमूद केलं. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या या पोस्टनंतर  आरोपीवर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.