Sharad Pawar NCP Raj Thackeray Uddhav Thackeray: मुंबई महापालिकासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Sharad Pawar NCP) उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती (Shivsena UBT And MNS Yuti) जाहीर झाली असताना शरद पवारांची राष्ट्रवादीने ठाकरे गटासह काँग्रेससोबतच्या युतीचा पर्याय खुला ठेवला आहे. दरम्यान, काँग्रेसने मुंबईत ठाकरे बंधूंसोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसनंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही ठाकरे बंधूंची साथ सोडून काँग्रेससोबत मुंबई महापालिकेची निवडणुक लढवणार की काय?, अशी चर्चा संध्या रंगली आहे. (BMC Election 2026)

Continues below advertisement

जयंत पाटील आज उद्धव ठाकरेंची घेणार भेट- (Jayant Patil Meet Uddhav Thackeray)

आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत आघाडीसंदर्भात चर्चेची शेवटची फेरी पार पडणार आहे. आज सकाळी 10 वाजता जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत आघाडी आणि जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे 31 जागा तर काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान आजच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाण्याचा निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून सन्मानजनक जागा देण्यास नकार- (Uddhav Thackeray-Sharad Pawar)

आज सकाळी जयंत पाटील मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्यासोबत अंतिम चर्चेसाठी मातोश्रीला जाणार तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव तर शिवसेनेकडे 31 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र काँग्रेसने 9 जागा देण्याची तयारी दर्शवली असून उर्वरीत 7 जागांबाबत वंचित सोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून सन्मानजनक वागणूक मिळतेय. मात्र सन्मानजनक जागा देण्यास नकार असल्याचंही बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ठाकरेंची सेना, काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

Continues below advertisement

शिवसेना BMC वर एकूण 30 वर्ष सत्तेत- (BMC Election 2026)

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना 1997 पासून सत्तेत आहे, त्याआधी 1987 ते 1992 सेना सत्तेत होती. 1989 साली सेना-भाजप युती झाली पण 1992 च्या निवडणुका दोन्ही पक्षांनी वेगळ्या लढवल्या. त्यावेळी काँग्रेस सर्वाधिक 111 जागा मिळवत सत्तेत  (1992 ते 1997) आली होती.

1992  - एकूण जागा 221 -  शिवसेना 70, भाजप 14, काँग्रेस 111, इतर 10, अपक्ष 16.1997 -  एकूण जागा 221 -  शिवसेना 103, भाजप 26, काँग्रेस 49, सपा 21, इतर 4, अपक्ष 18.2002 - एकूण जागा 227 -  शिवसेना 98, भाजप 35, काँग्रेस 61, राष्ट्रवादी 12, सपा 10, इतर 00, अपक्ष 11.2007 - एकूण जागा 227 - शिवसेना 84, भाजप 28, काँग्रेस 71, राष्ट्रवादी 14, मनसे - 07, सपा 08, इतर 06, अपक्ष 9.2012 -  एकूण जागा 227 - शिवसेना 75, भाजप 31, काँग्रेस 52, राष्ट्रवादी 13, मनसे - 28, सपा 09, इतर 04, अपक्ष 15.2017 -  एकूण जागा 227 - शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 09, मनसे - 07, सपा 06, इतर 03, अपक्ष 05.

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरनामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबरउमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंतअंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026मतदान- 15 जानेवारी 2026मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

संबंधित बातमी:

BMC Election 2026: मुंबई महापालिकेवर यंदा कोणाचा झेंडा, BMC निवडणुकीचा इतिहास, वॉर्ड, प्रभाग आरक्षण ते 2017 चा निकाल