Tujha Jhaga Ga song : महाराष्ट्रात 12 ते 13 वर्षांपूर्वी एक गाणं आलं होतं. (Tujha Jhaga Ga song) या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. अगदी क्रिकेट खेळताना असो किंवा मंडळांच्या मिरवणुकांमध्ये असो किंवा गल्ली बोळात असो हेच गाणं लावलं जायचं. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक जण हे गाणं गुणगुणताना पाहायला मिळायचा. अगदी खेड्यापाड्यांमध्ये देखील हे गाणं पोहोचलं होतं. हे गाणं म्हणजे 'तुझा झगा गं, तुझा झगा गं, वाऱ्यावर उडतो' (Tujha Jhaga Ga song)...दरम्यान महाराष्ट्राला वेड लावणारं हे गाणं (Tujha Jhaga Ga song) कोणी लिहिलंय? आणि कोणी गायलं? हे जाणून घेऊयात.. 

कोणी लिहिलंय 'Tujha Jhaga Ga' हे गाणं ?

महाराष्ट्राला वेड लावणारं हे गाणं अर्जुन घस्के आणि अतुल लोहार या दोघांनी लिहिलं होतं. हे गाणं गायलं अतुल लोहार यांनीच.. दरम्यान, हे गाणं महाराष्ट्रात तुफान व्हायरल झाला होता. लोकं हे गाणं त्याकाळी अक्षरश: ब्लुटूथने एकमेकांना शेअर करायचे. आज देखील हे युट्युबर पाहिलं जातं. 

युट्युबवर या गाण्याला किती "Views"?

T-Series Marathi च्या युट्युब चॅनेलवर आजही हे गाणं उपलब्ध आहे. या गाण्यावर तरुणी ब्लॅक ड्रेसमध्ये थिरकताना दिस आहे. शिवाय काही तरुणांनी देखील या गाण्याच्या व्हिडीओसाठी काम केलं आहे. सध्या युट्युब चॅनेलवर या गाण्याला 9,416,201 (नऊ लाख एकोणचाळीस हजार सहाशे एक) इतके व्ह्यूज आहेत. म्हणजे आज देखील हे गाणं तितकचं लोकप्रिय आहे. टी सिरीज मराठीने हे गाणं 2020 साली युट्युबवर अपलोड केलं होतं. 

व्हिडीओ स्वरुपात आणण्यासाठी हे गाणं एका डोंगरावर शूट करण्यात आलंय. या गाण्यात एक तरुणी ब्लॅक ड्रेसमध्ये तुफान नाचताना दिसत आहे. तर पाच ते सहा तरुण देखील या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. तरुण तिला पाहाताना लाजत आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन देखील अतुल लोहार यांनीच केले आहे. आजही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : गौतमी पाटीलच्या तालावर संपूर्ण गाव नाचणार, देवमाणसाचा काटा काढणार?

Ankita Walawalkar Post On Air India: अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर कोकण हार्टेड गर्लचा Air India ला खडा सवाल; फोटो शेअर करत पोलखोल, म्हणाली...