Bhandup bus accident: वर्षाचा शेवट भांडुपकरांसाठी भयावह ठरली.  याला कारण म्हणजे सोमवारी घडलेला भीषण अपघात.  (Bhandup Accident) सोमवार म्हणजे आठवड्यातला पहिला दिवस.  वर्षाचा शेवटचा सोमवार. यामुळे कामगारांची  रेल्वे, बस आणि मेट्रो बाहेर प्रचंड गर्दी जमते. काम आटपून कामगार घराच्या दिशेनं जात होते.  भांडूप रेल्वे स्थानकाबाहेरही कामगारांची घरी जाण्यासाठी लगबग होती.   फक्त कामगार नसून,  भाजी विक्रेते, फेरीवाल्यांमुळे भांडूप रेल्वे स्थानक गजबजलेलं होतं.  भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर बस स्थानक आहे. बस स्थानकाबाहेर प्रवासी रांगेत उभे होते. परंतु, सोमवारी रात्री बस स्थानकाबाहेर अघटित घडलं. अचानक बस चालकाचं  नियंत्रण सुटलं.  सुसाट  बसने 13 जणांना उडवलं.   य़ा भीषण अपघातात   4 जणांचा अपघाती मृत्यू झाला. यात मराठी मनोरंजन विश्वातील एका बालकलाकाराच्या आईचा देखील समावेश आहे. या अपघातानंतर भांडूपमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement

पूर्वा रासम (वय वर्ष 11) असे बालकलाकाराचे नाव आहे. तिची आई प्रणिता रासम यांचा अपघातील मृत्यू झाला.   पूर्वा अंधेरीत आपल्या  शुटिंगमध्ये व्यग्र होती.  तिच्यासोबत तिची आई प्रणिता देखील उपस्थित होते.  शुटिंग संपल्यानंतर मायलेकींनी घराची  वाट धरली.  साडेनऊच्या दरम्यान, दोघेही भांडूप स्थानकावर उतरल्या.  606  क्रमांकाची बसची दोघेही रांगेत वाट बघत होते.  मात्र, हीच बस काळ बनून अनेकांच्या अंगावर धावून गेली. बेस्ट बसच्या चालकाचं   नियंत्रण सुटलं. बसने रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडलं.  

या अपघातात 13 जण गंभीर जखमी झाले. तर, 4 जणांचा जागीच मृ्त्यू झाला. यात पूर्वाची आई प्रणिता यांचाही समावेश आहे.  भरधाव बसखाली पूर्वाची आई चिरडली गेली. तर, पूर्वा  बाजूला फेकली गेली.  डोळ्यांसमोर पूर्वाच्या आईचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी  अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला.  परंतु, या अपघातात  अनेक जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मंगळवारी प्रणिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारवेळी पूर्वा टाहो फोडला. डोळ्यादेखत आईचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे तिला अश्रू अनावर झाले. 

Continues below advertisement

आईचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे तिने  व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला.  "इलेक्ट्रिक बसेसचा आवाज येत नाही. आधीच्या बसेसचा आवाज यायचा. पण आताच्या बसेसचा आवाज येत नाही.   बसेसचा आवाज आल्यानंतर लोक बाजूला व्हायचे.  पण ही इलेक्ट्रिक बस मागून कधी आली आणि  कधी अपघात झाला,  हे कळालं नाही. या अपघातामुळे माई आई परत य़ेणार नाही.  पण  या बसेस तातडीने बंद करायला हवे.  आणखी तुम्ही कुणाचे बळी घेऊ नका", अशी मागणी पूर्वाने केली.