Neha Bhasin Decides Never Wants To Have Kids: मनोरंजन विश्वातल्या सेलिब्रिटींचं प्रोफेशनल आयुष्य जेवढं चर्चेत असतं, तेवढंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. ते काय करतात, ते काय खातात, त्यांचे कपडे कसे आहेत, यांसारख्या अनेक गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. सध्या अशीच एक चर्चा भारतातील एका सुप्रसिद्ध गायिकेबाबत रंगली आहे. या सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिकेनंसुद्धा (Bollywood Singer) तिच्या वैयक्तिक आयुष्यात मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतलाय. लग्नाच्या नऊ वर्षानंतरही गायिका आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि आपल्या अटी-शर्थींवर आयुष्य जगतेय. आम्ही ज्या गायिकेबाबत बोलतोय, ती गायिका म्हणजे, नेहा भसीन (Neha Bhasin). 

Continues below advertisement

आपल्या आवाजानं सर्वांना खिळवून ठेवणारी नेहा भसीन म्हणजे बॉलिवूडच्या गाजलेल्या गायकांपैकी एक मोठं नाव. नेहानं नुकतीच एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीत तिनं तिच्या आयुष्यातील मूलन होऊ देण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. यावेळी नेहा आणि तिच्या पतीनं म्हणजेच, संगीतकार समीर उद्दीननं मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. बरं दोघांनी हा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचंही नेहानं मुलाखतीत बोलताना सांगितलंय.  

नेहा भसीन सध्या 43 वर्षांची आहे, पण तरीसुद्धा तिला मूल नकोय, याचं कारण कुठेना कुठेतरी तिचा पती असल्याचं ती सांगते. नेहा नुकतीच रश्मी देसाईच्या Rashami Ke Dil Se Dil Tak पॉडकास्टमध्ये आली होती. तिथेच बोलताना तिनं तिच्या मूल न होऊ देण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. नेहा म्हणाली की, "आम्हाला असं वाटतं की, आमचं प्रेम आणि आमच्या भावना या आमच्यापुरत्याच ठेवून हा प्रवास संपवायचाय... आमच्यासाठी हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि आम्ही तो शांतपणे स्वीकारलाय..."

Continues below advertisement

आयुष्यात अनेकदा आपल्याला समजून घेतलं जात नाही, असं वाटत असलं, तरी... : नेहा भसीन

पुढे बोलताना नेहा स्वतःबद्दल आणि पतीबद्दल आणखी मनमोकळेपणानं सांगते. ती म्हणाली की, तिच्यासारख्या आणि समीरसारख्या लोकांनी कदाचित लग्नच करू नये, असं तिला वाटतं... नेहानं केलेलं वक्तव्य गमतीनं आणि मोकळेपणानं होतं. नेहाच्या मते, ती आणि समीर कुणाकडून कौतुक मिळावं म्हणून काम करणारे लोक नाहीत. त्यांच्या आयुष्यात सर्जनशीलता (क्रिएटिव्हीटी) हेच पहिलं प्रेम आहे आणि बाकी सगळं त्यानंतर येतं. त्या दोघांना त्यांच्या नात्यात कधीही कोणतेही गैरसमज झाल्यासारखं वाटलं नाही... याबद्दल "आयुष्यात अनेकदा आपल्याला समजून घेतलं जात नाही, असं वाटत असलं, तरी समीरबरोबरच्या नात्यात तिला कधीच असं जाणवलं नाही...", असं नेहा म्हणाली.

नेहा भसीन म्हणाली की, "तो माझ्यातल्या काही त्रुटी स्वीकारतो, तसंच मीही त्याच्यातल्या काही गोष्टी स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ, समीर रात्री 4-5 वाजेपर्यंत काम करत राहतो. काम नसतानाही तो काहीतरी करतच असतो. तुम्ही त्याला जिथे सोडाल, तिथेच तो 12 तासांनंतरही बसलेला दिसेल. त्यामुळे एखाद्या नात्यात तुम्हाला एकमेकांच्या अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात..."