मुंबई : देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यादरम्यान, बॉलिवूड विश्वाला अनेक दुखःद धक्क्यांचा सामना करावा लागला. तसेच अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला. तर अनेकांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीचा समावेश झाला आहे. टिक टॉकवर 1.1 मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या सिया कक्करने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. 24 जून रोजी सियाने आपल्या दिल्ली मधील प्रीत विहार येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या
केली.


एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, टिक टॉकवर आपल्या अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करणारी सिया कक्कर लवकरच म्युझिक व्हिडीओमध्ये डेब्यु करणार होती. तसेच या म्युझिक व्हिडीओची शुटींग लॉकडाऊननंतर सुरु होणार होती. यामुळे सिया फार आनंदीही होती.



11 वीमध्ये शिकणारी सिया कक्करचा हा म्युझिक व्हिडीओ मीट ब्रदर्सच्या म्युझिक कंपनी 'एमबी म्युझिक' द्वारे करण्याच येणार होता. मीट ब्रदर्सचे मॅनेजर सुमित शर्मा यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, 'सिया आपल्या म्युझिक लेबलचं गाणं 'शराबी तेरी टोर' आधीपासूनच आपल्या टिकटॉक अकाउंटवरून प्रमोट करत होती. आत्महत्येपूर्वीच तिने याच गाण्याचा एक प्रमोशनल व्हिडीओही पोस्ट केला होता. सियाच्या डेब्यू म्युझिक व्हिडीओच्या ऑफरवर आमची तिच्या टिमसोबत बोलणं होत होतं.'



सिया कक्करचे मॅनेजर अर्जुन सरीन यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, 'सियाला अॅक्टिंग आणि डान्सिंगचीआवड होती. 24 तारखेला 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान मी आणि सिया वेगवेगळ्या प्रकराच्या कॅम्पेनबाबत एकमेकांशी चर्चा करत होतो. त्यावेळी सिया व्यवस्थित होती. तिच्याशी बोलताना मला ती तणावात वाटली नाही. तसेच तिला एखाद्या गोष्टिचा त्रास असेल, असंही वाटलं नाही. ती अत्यंत साधी आणि आपल्या कामावर फोकस करणारी मुलगी होती. तिना असं टोकाचं पाऊल का उटललं, याबाबत काहीच कल्पना नाही.'



संगीतकार जोडी मीट ब्रदर्स यांनी सिया कक्करने आत्महत्या केल्याचं समजताच शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, 'सध्या अनेक लोक आत्महत्या करत असल्याचं समोर येत आहे. हे अत्यंत दुखःद आहे. आम्हाला अशी आशा आहे की, अशाप्रकारचं टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्या व्यक्तीने कोणाचीतरी मदत घेतली पाहिजे.'


महत्त्वाच्या बातम्या : 


सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला; समोर आलं मृत्यूचं खरं कारण


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी


सुशांतच्या मित्राची भावुक पोस्ट; म्हणाला - 'त्याला त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच वाचवू शकत होती'