Amazon Prime : ओटीटी प्लॅटफाॅर्मने मनोरंजन क्षेत्राची दुनियाच बदलून टाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफाॅर्मची चांगलीच चलती आहे. हळूवार कहाणीचा उलघडा करून ज्या पद्धतीने माहोल निर्मिती केली जाते की, ते पाहून प्रत्येक सीझन चाहते उत्सुकतेने वाट पाहत असतात. अशा अनेक वेबसिरिज (web series) आहे ज्यांनी ओटीटी प्लॅटफाॅर्म्सचा चेहरामोहराच बदलून गेला आहे.  देशात अॅमेझाॅन प्राईम व्हिडिओ लोकप्रिय करण्यात अनेक वेबसिरिजचा हात राहिला आहे. या लोकप्रिय वेबसिरिजमध्ये फक्त स्टोरीच पाहायला मिळाली नाही, तर चाहतेही कनेक्ट झाल्याचे दिसून आले. आपण अशाच लोकप्रिय अॅमेझाॅन प्राईमवरील वेबसिरिजची माहिती घेणार आहोत. 


मिर्झापूर  (Mirzapur)


मिर्झापूरमधील देशी अंदाज, देशी कॅरॅक्टर आणि मजेदार वनलाईनमुळे देशभरात ही वेबसिरिज लोकप्रिय झाली. कालीन भैय्यापासून मुन्ना भाईपर्यंत सर्व कॅरेक्टर लोकप्रिय झाले. या सिरीजमुळे पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू  शर्माला जबरदस्त लोकप्रियता मिळालीच, पण ओटीटी प्लॅटफाॅर्म जनतेमध्ये लोकप्रिय झाला.


पंचायत (Panchayat)


जेव्हा गावाकडील जीवन मनोरंजनामधून गायब होत चालले चालले असतानाच पंचायतची एन्ट्री झाली. पंचायत सरपंच, सचिव आणि गावातील कॅरेक्टर्समुळे जुन्या दिवसांची आठवण झाली. या पात्रांचा निरागसपणा आणि आयुष्य जगण्याच्या आणि छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद मानण्याच्या पद्धतीने चांगलाच प्रभाव पडला. यामध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव आणि नीना गुप्ता लीड रोलमध्ये होते. 


पाताल लोक (Pataal Lok)


दिल्लीमधील एका पोलिसाच्या हत्येचा उलघडा करताना कसा अस्वस्थपणा येतो हे पाहण्यासारखे आहे. पण अडचणींवर मात करून हत्येचा कट उलघडतो. यामध्ये जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी यांचा अभिनय आहे. 


द फॅमिली मॅन (The Family Man)


मनोज वाजपेयीची  वेबसिरिज असलेली द फॅमिली मॅन दोन सीझन आले आहेत. दुसऱ्या सीझनमध्ये साऊथ स्टार समंथा रुथ प्रभूने निगेटिव्ह रोल केला होता. या वेबसिरिजचे खूप कौतुक झाले. चाहत्यांना 


फोर मोअर शॉट्स प्लीज! (Four More Shots Please!)


ही कहाणी चार महिलांची आहे ज्या आपल्या जीवनात आपापल्या संघर्षात व्यग्र आहेत. या वेबसिरिजमध्ये आधुनिक काळातील समस्यांवर भाष्य करण्यात येत आहे. यामध्ये रिलेशनशिप मुद्यावर फोकस करण्यात आला आहे. या वेब सिरिजमध्ये शयोनी गु्प्ता, किर्ती कुल्हारी आणि मान्वी गगरु लीड रोलमध्ये आहे.  


हे ही वाचलं का ?